April 26, 2025

…अखेर ते उपोषण मागे;”माजी जिप अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांची यशस्वी मध्यस्थी”

अहेरी (अन्वर शेेख) तालुका प्रतिनिधी,  २१ जून:  तालुक्यातील येचली येथील अवैध रेतीसाठा प्रकरणी कंत्राटदारा फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच सदर प्रकाराला मुकसंमती देणा-या अधिकारी, कर्मचा-यांना निलंबित करण्याच्या मागणीला घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी 14 जूनपासून अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले होते. दरम्यान माजी जिप अध्यक्षा भाग्यरी आत्राम यांनी मधस्थी करीत जिल्हाधिका-यांशी चर्चा केल्याने ताटीकोंडावार यांनी काही अटिंसह तात्पूरता आंदोलन मागे घेतले आहे.

येचली नदी घाटातील रेतीची उचल न करताच बनावट दस्ताऐवजाच्या आधारे रेती बांधकाम वापरल्याबद्दल तसेच मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध साठा केल्या प्रकरणी ताटीकोंडवार यांनी स्थानिक प्रशासनासह वरिष्ठ स्तरावर तक्रार केली होती. मात्र यावर कोणतीही कारवाई न झाल्याने संबंधित दोषी अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारावर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन त्यांनी 14 जूनपासून अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले होते. दरम्यान माजी जिप अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी आंदोलनस्थळी भेट देत ताटीकोंडावार यांचेशी चर्चा केली. जिल्हाधिकारी यांचेशी मोबाईलद्वारे चर्चा केली. सदर प्रकरणी एक महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी निंबूपाणी पाजून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. ताटीकोंडावार यांनीही कारवाई होईस्तोवर तात्पूरते आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपोषणस्थळी माजी जिप अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, रायुकॉं तालुकाध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार यांचेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!