December 23, 2024

“शहरातील अवैध दारू विक्री विरोधात युवकांनी कंबर कसली; पोलीस विभागाला सादर केले निवेदन”

1 min read

“नगर पंचायत कुरखेडा येथील पाणी पुरवठा व जलनिस्सरण सभापती जयेंद्रसिंह चंदेल यांनी पुढाकार घेत पोलिस विभाग सोबत चर्चा करून शहरातील अवैध दारू विक्री बंद करण्याची विनंती केली.”

कुरखेडा, (प्रतिनिधी); २१ जून: कुरखेडा शहरातील अवैध दारू विक्री बंद करण्याकरिता आज पोलीस विभागाला निवेदन सादर करण्यात आले. येथील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करून पोलिस अधीक्षक गडचिरोली यांना ही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे .
पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या निवेदनातून कुरखेडा शहरासह संपूर्ण तालुक्याची दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. उघडपणे अवैध दारू विक्री होत असल्याने येथील युवक वर्ग दारूच्या आहारी जाऊन मृत्यूच्या दाढे पोहोचलेला आहे. कित्येक संसार यावे दारू विक्रीमुळे उघड्यावर पडलेले आहे. सोप्या व मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारी अवैध दारू समाजातील सर्व लोकांना प्रभावित करीत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कुरखेडा शहरात दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये दारू ही प्रमुख कारण असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गावातील सामाजिक स्वास्थ व्यवस्थित ठेवण्याकरिता अवैधपणे उपलब्ध होणारी दारू तात्काळ बंद व्हावी अशी मागणी युवकांनी केली आहे.

पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना निवेदन सादर करतांना युवक

अनेक युवकांना दारूचे व्यसन लागल्यामुळे त्यांना आपले प्राण गम्मावे लागले असल्याचे चित्र कुरखेडा पाहायला मिळाले आहे. दारूबंदी जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने दारू विकली जात आहे एवढी दारू सुरू असलेल्या जिल्ह्यात सुद्धा मिळत नसेल. बनावट स्वरूपाची मिळणारी दारू आरोग्यासाठी किती घातक असू शकते याचा अंदाज बांधणे हे कठीण आहे. देशी विदेशी विविध दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे यावर अंकुश लावण्या गरजेची असल्याचे बोलले जात आहे.
मोठ्या प्रमाणात युवकांनी सदर निवेदन देताना सहभाग नोंदवला असून या निवेदनाला सादर करतेवेळी येथील नगरपंचायत चे पाणीपुरवठा सभापती जयेंद्रसिंग चंदेल, स्वच्छता सभापती अतुल झोडे, नगरसेवक सागर निरंकारी, ताहेर शेख, शहेजाद हाशमी, चेतन मैंद, सुरज जांभुळकर, प्रीतम वालदे, दीपक धारगाये, साहिल साहारे, बालवीर बोदेले, भीमराव वालदे, प्रकाश चौधरी, साईनाथ कोंडवार आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!