“बनावट सदस्यांच्या आधारे होणारी आविका निवडणूक रद्द करा, पत्रपरिषदेत तालुका काँग्रेस कमिटीची मागणी”
1 min read“मर्जीतील अपात्र बनावट लोकांची नावे टाकून तयार केलेली यादीत संशोधन करून नवीन यादी प्रसिद्ध करून निवडणूक घेण्याची मागणी”:”१९ जुलै २०२३ रोजी होणार आहे मतदान”
कुरखेडा; (प्रतिनिधी); २७ जून: आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडा निवडणुका वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत. तालुका काँग्रेस कमिटीने या निवडणुकीसाठी तयार केलेली यादी बनावट असल्याचा आरोप करत निवडणूक रद्द करून बनावट यादी संशोधित करून निवडणूक घेण्याची मागणी केली.
येथील किसान मंगल कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आरोप लावला आहे की आविका कुरखेडा 2023 होणाऱ्या निवडणुकी त मोठ्या प्रमाणात घोळ असून मर्जीतील काही लोकांचे नाव टाकून यादी तयार करण्यात आलेली आहे. ज्या लोकांच्या नावे मतदार यादी टाकण्यात आलेले आहेत त्या लोकांची नियम प्रमाणे कुठलीही पात्रता नाही. नसतानाही त्यांना निवडणुकीत उभा करून पदाधिकारी बनवण्याचा डाव आखण्यात आलेला आहे. तयार केलेली यादी कुठल्याही प्रकारे जाहीर न करता गुप्त पद्धतीने मर्जीतील लोकांची नावे समाविष्ट करण्यात आली असून एकंदरीत संपूर्ण यादीत बनावट असल्याचा यावेळी आरोप केलेला आहे.
उमेश नेवाजी वालदे यांच्या नामनिर्देशन पत्रावर घेतलेल्या आक्षेपावर येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी उत्तर देत त्यांचे नामनिर्देशन वैध ठरवले होते. परंतु उमेश वालदे यांचे सदस्यत्व बनावट असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. नियमाप्रमाणे भाविकांचा सदस्य होण्याकरिता दहा हजार कमीत कमी त्या व्यक्तीच्या नावे असणे गरजेचे आहे. तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यावेळी दावा करण्यात आला की उमेश वालदे यांच्या नावे कुठलीही शेती नाही तरीही त्यांना सदस्यत्व देण्यात आलेले आहे. त्याच प्रकारे कुठल्याही औपचारिक पद्धतीचा अवलंब न करता परस्पर मतदार यादी तयार करून निवडणूक एकतर्फी करण्याचा डाव असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे.
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या सदर पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष जीवन नाट, माजी जी प. सदस्य प्रभाकर तुलावी, माजी प. स. सभापती गिरधर तीतराम, उपसभापती श्रीराम दुगा, चिंतामण जुमनाके, पुंडलिक निपाणे, मधुकर गावडे, रवी सोनकुसरे , विठ्ठल खानोरकर, राजू सोनकुसरे, उपस्थित होते.
निवडणूक नियमानुसारच, सुशील डी. वानखेडे, निवडणूक निर्णय अधिकारी,
येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कुरखेडा र.नं.1123 चिऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक नियमानुसार होत असल्याचे बोलले आहे. सभासदांची यादी ही संस्था स्तरावर तयार करून विभागाकडे सादर केले जाते व त्यावर आक्षेप नोंदवण्याची संधी दिलेली असते. आक्षेप न आल्यामुळे प्रारूप स्वरूपाची तयार मतदार यादी अंतिम रूप देण्यात आलेला आहे. सदर निवडणुकीमध्ये सर्व काम नियमानुसार होत असल्याचे त्यांनी बोलले आहे.