“पावसाच्या पहिल्या फेरीतच कोरची व कुरखेडयात सर्वाधिक पावसाची नोंद”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी): २७ जून: गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस कुरखेडा व कोरची तालुक्यात सर्वाधिक झाल्याची नोंद आहे.
मृग नक्षत्राच्या पहिल्या आठवड्यात दांडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसापासून निरंतर वर्षाव सुरू केलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसाची माहिती अशी की, गडचिरोली : 28.5, कुरखेडा : 63.4, आरमोरी : 54.2, चामोर्शि : 20.6, सिरोंचा : 21.9, अहेरी : 17.5, एटापल्ली: 15.4, धानोरा : 31.1, कोर्ची : 136.7, देसाईगंज : 56.5, मुलचेरा : 18.2, भामरागड : 18.1 संपूर्ण जिल्ह्याच्या पावसाची सरासरी 40.2 मिलिमीटर एवढी आहे.
गेल्या 24 तासात झालेल्या नोंदीमध्ये कोरची तालुक्यातील कोरची 162.00mm, कोटगुल 90.6mm, व बेळगाव 157.4mm येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद आहे. कुरखेडा तालुक्यात कुरखेडा मुख्यालय 77.2mm व पुराडा 70.4mm येथे सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे.
पुढील ४८ तास परत याच प्रमाणे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निरंतर पावसामुळे शेती मशागत व पेरणी प्रभावित झाल्या आहेत.