अहेरी येथील A T M मध्ये १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना”
1 min readअहेरी; अन्वर शेख, (प्रतिनिधी); २८ जून : येथील गडचिरोली डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या समोर असलेल्या A T M मध्ये एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ९:३० च्या सुमारास घडली.
सदर तरुणीने घटनेची तक्रार अहेरी पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीत सदर इसम माझ्यासाठी अनोळखी होता आणि त्याने एका हाताने माझ्या हाथ पकडुन दुसऱ्या हाताने बांधलेला स्कार्फ काढू शरीरावर इतर ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे . तरुणीचा विनयभंग करणारा व्यक्ती हा शिक्षक असल्याचे प्राथमिक माहिती आहे. घटने नंतर उपस्थित नागरिकांनी चोप दिल्याने जख्मी अवस्थेत जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
सदर तक्रारीनुसार शिक्षकावर ३५४,३५४(अ), ३५४(ब), ५०९ भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अहेरी चे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या मार्गदरशनाखाली महिला पोलिस उपनिरिक्षक करिष्मा मोरे या तपास करत असून त्या शिक्षकाला काही जणांनी बँकेत मारहाण केल्याची माहिती आहे. सदर शिक्षकाला उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे उपचारानंतर गडचिरोली येथे रेफर करण्यात आले आहे.पोलिसांनी ए टी एम चे सी सी टी वी ताब्यात घेतले नेमके ए टी एम मध्ये काय घडले याचा तपास होणार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर मांभाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे या करीत आहे.