December 23, 2024

“सन २०२३-२४ करीता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेशाची सुवर्णसंधी”

1 min read

गडचिरोली, (प्रतिनिधी) ५ जुलै: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता १३ मुलांचे व ८ मुलींचे असे एकुण २१ शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यांची एकुण इमारत प्रवेश क्षमता २११५ असुन त्यातील सन २०२३-२४ करीता रीक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता http://www.swayam.mahaonline.gov.inया प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. गडचिरोली येथे मुलांचे दोन व मुलींचे एक असे एकुण तीन वसतीगृह आहेत. गडचिरोली

वसतीगृहात इयत्ता ११वी ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तसेच गडचिरोलीचे तीन वसतीगृह वगळता उर्वरीत अठरा वसतीगृहात इयत्ता ८ वी पासुन पुढे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरतांना सदर प्रणाली मध्ये दिलेल्या सुचनांचे काळजीपुर्वक वाचन करावे तसेच सदरील सुचनेनुसार कागदपत्रांची जोडणी करण्यात यावी. वसतीगृहातील जुने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेऊन अर्ज Renew हे Option निवडुन भरावे. असे न केल्यास सदर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे असे समजुन त्याचे जागी नविन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढुन कागदपत्रांसह हार्डकॉपी संबंधीत वसतीगृहात एक आठवड्याच्या आत सादर करावी. वसतीगृह प्रवेशाचे संकेतस्थळ पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता दि. ३१ जुलै २०२३ पर्यत व व्यावसायीक अभ्यासक्रमाकरीता ३१ ऑगष्ट २०२३ पर्यंत सुरू राहील त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे. तसेच खासबाब प्रवेशाबाबतच्या लोकप्रतिनिधी शिफारशी दि. २५ ऑगष्ट २०२३ पर्यंत प्रकल्प कार्यालयात सादर करावे. असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांनी कळविले आहे.

About The Author

error: Content is protected !!