December 23, 2024

“सन 2023-24 वर्षात प्रवेशित/प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र करिता अर्ज करावे”- उपायुक्त देवसूदन ना. धारगावे

1 min read

गडचिरोली, (प्रतिनिधी), 5 जून :सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात 11 वी, 12 वी विज्ञान शाखेतील तसेच सेवा व निवडणुकीचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत नमून्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक त्या दस्ताऐवजासह समितीस दिनांक 21 जुन 2023 पर्यंत दाखल केले अशी प्रकरणे निकाली (त्रृटीचे प्रकरणे वगळता) काढण्यात आलेले आहेत. तरी ज्या अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या ई-मेल आय.डी.वर आजपर्यंत प्राप्त झालेले नाही. अशी सर्व प्रकरणे त्रृटीत असल्याने अर्जदारांनी कार्यालयीन वेळेत दिनांक 11 जुलै 2023 रोज मंगळवारला मानीव दिनांकाचे जात व अधिवास पुराव्यांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे.

सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात राखीव प्रवर्गातून व्यावसायीक पाठयक्रमात राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे तसेच 11 वी, 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव घेणे चालू आहे. तरी सर्व अर्जदारांनी कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन उपायुक्त देवसूदन ना. धारगावे यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!