“नगरपंचायत कुरखेडा येथील बांधकाम व घनकचरा निविदा प्रक्रिया रद्द करून अनियमितता बाबत सखोल चौकशी करून दोषींवर उचित कार्यवाही करा – रोशन कुंभलवार, यांची निवेदनातून मागणी”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); ६ जुलै: कुरखेडा नगर पंचायत येथील निविदा प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. घनकचरा निविदा वाद पोलिस स्टेशन पर्यंत पोहचला आहे. निविदा प्रक्रिया मध्ये येथील प्रशासन अधिकारी प्रवीण गिरमे व अभियंता आरीफ शेख यांची भूमिका संशयास्पद असून या निविदा रद्द करून प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी येथील कंत्राटदार रोशन कुंभलवार यांनी निवेदन द्वारे केलेली आहे.
स्थानिक कंत्राटदारांना डावलण्याच्या उद्देशाने किचकट व अव्यवहार्य अटी टाकून घनकचरा निविदा टाकण्यात आल्या. परिणामी त्या दोन्ही निविदा रद्द करण्याची नामुष्की नगरपंचायत कुरखेडा वर ओढवलेली आहे. अटी व शर्ती शिथिल करतांना तिसऱ्यांदा ही विशेष लोक सहभागी होवू शकतील अश्याच अटी टाकण्यात आल्या आहेत. निवेदन ऑनलाईन करण्या पूर्वी मर्जीतील कंत्राटदार सोबत पदाधिकारी व अधिकारी यांनी बैठक सुद्धा केली असल्याची माहिती आहे. घनकचरा प्रमाणेच बांधकाम निविदा मध्ये ही मोठा घोळ असून संगनमत करून निविदा बहाल करण्याचे प्रकार नगरपंचायत कुरखेडा येथे सुरू आहे.
दिनांक ०३/०७/२०२३ रोजी पत्र क्रमांक न पं कू/बांधकाम/जा. क्र./२६/२०२३ नुसार तीन पेक्षा कमी पात्र निविदाधारक प्राप्त झाल्याचे कारण सांगून ई निविदा रद्द केलेल्या आहेत. अपुरे दस्तऐवज असल्याचे कारण देत एकूण ६ निविदा रद्द केलेल्या आहेत. उर्वरित ३ निविदा मंजूर करत असताना केवळ मर्जीतील ३ निविदा धारक पात्र म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे. या निविदांचा अवलोकन केला असता कुठलीच स्पर्धा झाल्याचे दिसत नाही. १ टक्के पेक्षा ही कमी दर या मध्ये असल्याचे दिसते. निविदा उघडण्याची तारीख २० एप्रिल २०२३ असताना सुद्धा तीन महिने विलंब करून निविदा दस्तऐवज अपुरे असल्याचे कारण सांगून रद्द करणे शंसयस्पद आहे. मर्जीतील कंत्राटदाराला निविदा होत नसल्याचे लक्षात आल्या मुळेच सदर निविदा रद्द केल्या आहेत. कारण निविदा रद्द करतांना तांत्रिक मूल्यांकन तक्ता अपलोड केला नसल्याचे दिसते. माहिती प्रमाणे निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या सर्वच लोकांनी नियम प्रमाणे आवश्यक सर्व कागदपत्र ऑनलाईन सादर केलेले आहे. कारण कुठलाही कंत्राटदार निविदा ऑनलाईन सदर करतांना मोठी रक्कम अनामत म्हणून भरत असतो तो अशी चूक करूच शकत नाही.
सदर प्रकरणात तांत्रिक मूल्यांकन तक्ता तपासून खरंच अपुरे दस्त ऐवज आहेत की हेतुपुरपसर निविदा रद्द केलेल्या आहेत या बाबत तपास करावा. कुरखेडा शहराचा विकासात अडसर निर्माण करणाऱ्या व स्थायी आदेश ३६ चे उल्लंघन करणाऱ्या अभियंता आरीफ शेख व प्रशासन अधिकारी प्रवीण गिरमे यांचे विरोधात शिस्तभंग कार्यवाही प्रस्तावित करावी अशी मागणी निवेदनातून केलेली आहे.