“तळागाळातील लोकांना रोजगार देणाऱ्या सुरजागड प्रकल्पाच्या कामाला निवडणुकीसमोर विरोध व निदर्शने का ? सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा सवाल”
1 min readअहेरी ; अन्वर शेख, (प्रतिनिधी); १२ जुलै : गडचिरोली उद्योग विरहित जिल्हा म्हणून देशात ओळखला जात होता. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर मागील दीड वर्षापासून लोह खनिजाचे उत्खनन सुरु झाल्यापासून ही ओळख हळूहळू दूर होत आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील हाजरो हातांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम मिळत आहे. मग राजकारण्यांनी विरोध करण्याचे कारण काय? असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी विचारला आहे. रत्स्याची आणि वाहतुकीची समस्या हे प्राशासन व लोकप्रतिनिधींनी सोडवायला पाहिजे होती. परंतु त्यांनी यासाठी कधीच वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला नाही. जे नेते आज आंदोलनाची भाषा करीत आहे, त्यांनी आपली घरे भरली. पण कधीच गरीब आदिवासी जनतेच्या रोजगारासाठी ते रस्त्यावर उतरले नाही. आज कित्येक दशकानंतर जिल्ह्यात उद्योग उभा राहतो आहे. पंक्चर, चाहविक्रेते, हॉटेल दुकानांपासून वाहतूक व्यवसायिक तसेच खाणीत कामाला जाणारे या सर्वांना मोठ्या प्रमनात रोजगार उपलब्ध झाला आहे. या सर्वांच्या घरची चूल आज या प्रकल्पामुळे पेटत आहे. मग रस्त्याची मागणी न करता गरिबांच्या पोटावर लात मारण्यासाठी काही राजकारण्यानी प्रकल्पविरोधी आवाज उठवला आहे. या स्वार्थी नेत्यांच्या गोष्टींना बळी न पडता त्यांना धडा शिकवा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हाध्यक्ष, भ्रष्टाचार निवारण समिती, गडचिरोली संतोष ताटीकोंडावार यांनी केले आहे.
सगळ्या कामगारांना जो पर्यंत रोजगार उपलब्ध करून देत नाहीं तो पर्यंत आम्ही सुद्धा या नेत्यांचा घरा समोर आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.