December 23, 2024

गडचिरोली; (प्रतिनिधी); १२ जुलै: लोकप्रतिनिधी आणि अधिकारी शासन प्रणालीचे अविभाज्य घटक आहेत. जनतेच्या मूलभूत समस्यांचे निराकरण आणि सर्वांगीण विकासाची जबाबदारी या दोन्ही घटकांवर अवलंबून आहे. विकास रथाची ही दोन्ही चाके एकरूप असावी. क्षेत्राच्या विकासाची धुरा विद्यमान लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर आहे. स्वच्छ रस्ते, बंद गटारे, स्वच्छ पाणी, ग्रामीण व शहराचे सौंदर्यीकरण या भौतिक विकासासह शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना सहज, सुलभपणे मिळावा यासाठी प्रयत्न करावे. आपला क्षेत्र दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. विकासाच्या दृष्टीने खूप मागे आहे असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

देसाईगंज तालुक्यातील शंकरपुर ग्रामपंचायत अंतर्गत डोंगरमेढा येथील पहाडी जवळ सभामंडप व पहाडी येथे सुशोभीकरण करणे. भुमिपुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नानाभाऊ नाकाडे जिल्हा परिषदेचे माजी कृषि सभापति, ज्ञानदेवजी परशुरामकर, राकेश नाकाडे, श्रीराम राऊत, आकाश ढोरे, हेमु नाकाडे, प्रमोद. मेश्राम, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!