“बीआरएस ची जिल्ह्यात पोस्टर द्वारे प्रचार मोहीम तेज; “अबकी बार , किसान सरकार!” वाक्य पोहोचले दुर्गम भागात”
1 min readअहेरी; अन्वर शेख; (तालुका प्रतिनिधी); १८ जुलै:
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे नेते माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात संगठन मजबुती व विस्तार मोठ्या प्रमाणत सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्षाचे पोस्टर लावले असून शेतकरी अभिमुख सत्ता अण्ण्या करिता तेलंगणाचे मॉडेल प्रस्तुत केले आहे.
तेलंगणा राज्य निर्मितीसाठी लढा देणाऱ्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर भारत राष्ट्र समिती असे नामकरण करण्यात आले. भविष्यात विस्ताराच्या दृष्टीने या पक्षाकडून महाराष्ट्रातील काही जागा लढविण्यात येणार आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेचा समावेश असून माजी आमदार दीपक आत्राम हे तयारीला लागले आहेत.
आमचा निर्धार शेतकऱ्यांच्या उद्धार हे ब्रीदवाक्य शेतकऱ्यांना व जनमानसाला आकर्षित करीत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पक्षात प्रवेशासाठी नवीन व जुने राजकीय नेते, कार्यकर्ते संपर्क करीत असल्याची माहिती आहे. पक्षाची तेलंगणा येथे शेतकरी अभिमुखं सत्ता मॉडेल प्रस्तुत करून जनमानसात मोठी आशा प्रफुल्लित केले आहे.
बी आर एस च्या पोस्टर वर खालील मुद्यांना स्थान देण्यात आलेला आहे.
१) किसान बंधू- प्रत्येक शेतकऱ्यांना शेती खर्चासाठी प्रति वर्ष प्रति एकर दहा हजार रुपये आर्थिक मदत.
२) शेतीसाठी वीज – शेतीसाठी २४ तास योग्य दाबाची मोफत वीज.
३) शेतमालाची खरेदी – खरेदी केंद्रावर शेतमालाची हमी भाव खरेदी.
४) शेतीसाठी पाणी – शेतीसाठी प्रकल्पातून मोफत अखंड पाणी पुरवठा.
५) किसान विमा – प्रत्येक शेतकऱ्याला ५ लाखाचा जीवन विमा.
६) शिक्षण शुल्क प्रति पूर्ती – अनेक निवासी गुरुकुल विद्यालये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्काची सरकार कडून प्रति पूर्ती योजना.
७) दलित बंधू – दलितांच्या उत्थाणकरिता दलित कुटुंबांना उद्योग – व्यवसायासाठी १० लाख रुपये अनुदान.
जर तेलंगणातील के सी आर सरकार हे करू शकत असेल तर, महाराष्ट्रात का होवू शकत नाही? असा प्रश्न ही उपस्थित केलेला आहे.
माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात संगठन इतर पक्षांसमोर मोठे आवाहन निर्माण करेल असे जाणकारांचे मत आहे.