December 23, 2024

“भुमिगत पुलाखाली पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा; तालुका काँग्रेसने बेशरमाची झाडे लावुन प्रशासनाचा केला निषेध”

1 min read

देसाईगंज; (प्रतिनिधी); १८ जुलै: जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या देसाईगंज शहराच्या कुरखेडा-लाखांदुर टी-पाईंट लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा दुवा असला तरी या मार्गावर फ्लायओव्हर तयार करण्याला बगल देत भुमिगत पुल तयार करण्यात आले.या भुमिगत पुलात जराही पाऊस आल्यास पाणी साचुन वारंवार होत असलेल्या वाहतुकिच्या खोळंब्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पाहु जाता देसाईगंज तालुका काँग्रेसच्या वतिने गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात घटनास्थळी बेशरमाची झाडे लावुन नगर प्रशासनाचा जाहिर निषेध करण्यात आला.

अतिदुर्गम,अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्याची देसाईगंज शहर हे मुख्य बाजारपेठ म्हणून सर्वञ ओळख आहे.देसाईगंज शहर हे रेल्वे क्रॉसिंगमुळे दोन भागात विभागलेले असुन एका बाजुला मुख्य बाजारपेठ तर दुसऱ्या बाजुला शासकीय कार्यालये,शाळा महाविद्यालये आहेत.त्यामुळे एका भागातील नागरीकांना बाजार,शैक्षणिक कामासाठी तद्वतच कार्यालयीन कामासाठी रेल्वे क्रॉसिंग ओलांडून जावे लागत असणे नित्याची बाब आहे. दरम्यान गोंदिया-वडसा- चंद्रपुर या रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या सुपरफास्ट,डेमो तसेच मालवाहतूक रेल्वे गाड्यांमुळे वारंवार रेल्वे फाटक पाडुन वाहतुक बंद करण्यात येत असल्याने यावर पर्याय म्हणून फ्लायओव्हर ब्रीज या संकल्पनेला बगल देत भुमिगत पुलाची निर्मिती करण्यात आली.
नगर परिषद सत्तेत सत्ताधारी असताना वाहतुकिताचा खोळंबा होत असल्याचे लक्षात घेता भुमिगत पुलाखाली साचणाऱ्या पाण्याचा पर्यायी व्यवस्था करून निचरा करण्यात येत होता.माञ मागील वर्षभरापासुन नगर परिषदेचे सत्ता सुञ नगर प्रशासनाच्या हातात असताना जराही पाऊस पडला असता भुमिगत पुलाखाली पाणी साचुन वाहतुक खोळंबणे नित्याची बाब झाली आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता शहरवाशियांच्या वतिने वारंवार निवेदन देऊन,आंदोलनाचा इशारा देऊनही ठोस उपाययोजना अंमलात न आणल्याने दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे वाहतुक खोळंबण्याची नामुश्की ओढवली आहे.हि गंभीर बाब लक्षात घेता भुमिगत पुलाखाली वारंवार पाणी साचुन होत असलेल्या वाहतुकिच्या खोळंब्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावा,या मागणीला घेऊन देसाईगंज तालुका काँग्रेसच्या वतीने घटनास्थळी बेशरमाची झाडे लावुन नगर प्रशासनाचा बेशरमाची झाडे लावुन जाहिर निषेध करण्यात आला.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदू भाऊ नरोटे,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,मनोज ढोरे गडचिरोली जिल्हा ओबीसी काँग्रेस सचिव,युवक काँग्रेस माजी शहर अध्यक्ष पिंकू भाऊ बावणे,कॉंग्रेस तालुका अध्यक्ष पंकज चहांदे,आदिवासी महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष जयमाला पेंदाम, पुष्पा कोहपरे,नरेश लिंगायत, शुभम तोडकर, जीवन पिल्लेवान, अनिल कुमरे, लोकेश शेंडे, विजय पिल्लेवान वनिता शिडाम, बेबी पठाण, शिमा कोहचाडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!