December 22, 2024

“महाराष्ट्र – छत्तीसगड सिमेवर आसरअल्ली पोलिसांची धडक कारवाई ; 15 लाख रुपयांचा गांजा जप्त”

1 min read

सिरोंचा,(प्रतिनिधि); २३जुलै: महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील आसरअल्ली पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या आसरअल्ली ते पातागुडम मार्गावरील वनविभागाच्या तपासणी नाक्याजवळ छत्तीसगड वरून महाराष्ट्रात येणारा 15 लाख रुपये किमतीचा गांजा आसरअल्ली पोलीसांनी जप्त करून आरोपींना अटक केली. ही घटना दिनांक 23 जुलै रविवारी करण्यात आली.

आसरअल्ली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश गावडे यांना छत्तीसगड राज्यातून चारचाकी वाहनाने अंमलि पदार्थ (गांजा) असरअल्ली कडे येत असल्याची गोपनिय खाञीशिर माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन असरअल्ली हद्दीतील असरअल्ली ते पातागुडम रोडवरील फॉरेस्ट नाक्याजवळ सापळा लावून बसले असतांना एक चारचाकी वाहन येत असतांना दिसले. सदर वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता सदरचे वाहन हे रोडच्या खाली उतरवून आपली कार सोडून पडू लागला. तसेच सदर वाहनातून अजून महिला व पुरुष पडू लागले असता पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग मोठ्या शिताफीने करुन एक महिला व एक पुरुष यांना पकडले. त्यानंतर सदर कारची पाहणी केली असता कारच्या मागील डिक्कीमध्ये ३६ लहान बॉक्स मिळून आल्याने सदर बॉक्सची पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे १५० किलो अंमली पदार्थ (गांजा) अंदाजे किंमत १५,००,०००/- लाख रुपये व सदर गुन्हयात वापरेलेली चार चाकी वाहन अंदाजे किंमत ५,००,०००/- रु असा एकुण अंदाजे किंमत २०,००,०००/- रुचा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पोलीस स्टेशन असरअल्ली येथे आणून आरोपी नामे १) शिव विलास नामदेव व २ ) ज्योती सत्येंद्र वर्मा, दोन्ही रा. उत्तरप्रदेश यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलिस निरिक्षक राजेश गावडे, हे करीत आहेत.


सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक सा. गडचिरोली श्री निलोत्पल, मा. अपर पोलीस अधिक्षक सा.श्री. अनुज तारे, मा. अपर पोलीस अधिक्षक सा.श्री. कुमार चिंता, मा. अपर पोलीस अधिक्षक सा.यतिश देशमुख व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुहास शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सहायक पोलीस निरीक्षक राजेश गावडे, पोलिस शिपाई जगन्नाथ कारभारी, दिलीप ऊड़के, शंकर सलगर, दिनाथ फड यांनी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!