” कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी परिसरात रानटी हत्तींचा धुमाकूळ; रोवणी झालेल्या धानपीकाची मोठ्या प्रमाणात नासाडी”
1 min readकूरखेडा ; (प्रतिनिधी); २३ जुलै: तालूका मूख्यालयापासून १४ कीलोमीटर अंतरावर असलेल्या चारभट्टी परिसरात काल रात्रि ते आज पहाटे दरम्यान रानटी हत्तीचा कळपाने धूमाकूळ माजवत या परिसरातील अनेक हेक्टर धान शेती पायदळी तूडवत उध्वस्त केल्याने शेतकर्यांचे मोठे नूकसान झाले आहे.
या नूकसानीची येथील पदाधिकार्यानी आज रविवार रोजी पाहणी केली व वनविभागाने तातडीने नूकसानीचे पंचनामे करीत नूकसान भरपाई अदा करावी अशी मागणी केली आहे.
गोंदिया जिल्हातील राजोली भरनोली परीसरातील जगंलातून काल रात्री १४ च्या संख्येत असलेल्या रानटी हत्तीचा कळपाने चारभट्टी परिसरात प्रवेश करीत येथील धान पिकाला पायदळी तूळवत नासाडी सूरू केली. हत्तीचा उपद्रवाची कूणकूण गावकर्याना लागताच गावकर्यानी समूहाने घटणास्थळाकडे धाव घेत टार्च व विस्तव पेटवत हत्तीचा कळपाला पीटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पहाटे पर्यंत त्यांचा उपद्रव सूरूच होता. यानंतर ते जगंलाचा दिशेने निघून गेले.
चारभट्टी येथील शेतकरी सूर्यभान हर्षे,भागवत निंबेकर,फकीरा सोनबोईर सोनाली मारगाये जनकलाल भैसारे पुसाऊ आडील मनोहर आडील भाऊराव तिरगम केवळराम नाट करंगसू कवडो सूरेश कवडो पतीराम कवडो आनंदराव तिरगम जांभूळकर या शेतकर्यांचा धान पीक हत्तीचा कळपाने पायदळी तूडवत मोठे नूकसान केले.
आज रविवार रोजी या परीसरातील नूकसान ग्रस्त शेतीची माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष परसराम नाट वासूदेव निंबेकर भास्कर किंचक यानी पाहणी केली व नूकसान ग्रस्त शेतकर्याना तातडीने नूकसान भरपाई अदा करण्याची मागणी केली. यावेळी वनविभागाचे क्षेत्रसाहायक शेंडे वनरक्षक काशीवार , वनमजूर विट्ठल मांडवे , मधूकर दरवडे यानी नूकसानीचे सर्वेक्षण करीत अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवत असल्याचे सांगीतले.