“पत्रकार संदीप महाजन यांच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची व्हॉईस ऑफ मीडियाची मागणी”
1 min read“उपविभागीय अधिकारी , कुरखेडा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर”
कुरखेडा; (प्रतिनिधी); ११ऑगस्ट: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील वृत्तवाहिनीने धडाडीचे पत्रकार संदीप महाजन यांच्या वर आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा व्हाईस ऑफ मिडिया संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
लोकशाही चा चौथा स्तंभ समजला जाणारा पत्रकारितेवर हा हल्ला म्हणजे पत्रकारितेचे मुस्कटदाबी आहे. आ. किशोर पाटील आणि त्यांच्या हल्लेखोर समर्थकांवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी अशी आम्ही मागणी निवेदनातून केलेली आहे. पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात पत्रकारितेच्या जगतात उमटली होती. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली. तरीही आमदारांची खुमखुमी थांबत नव्हती. संदीप महाजन आज रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. नगरपालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक महाजन यांचे स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावानं ओळखला जातो. येथेच त्यांना लाथा बुक्कयांनी बेदम मारहाण केली गेली. महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे.
सत्य बातमी देणाऱ्या पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्यानं घडत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना काम करणे अशक्य झाले असून राज्यात माध्यम स्वातंत्र्यच धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी आ. किशोर पाटील व त्यांच्या हल्लेखोर समर्थकावर कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा वॉइस ऑफ मीडिया गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष नसीर हाश्मी यांनी व्यक्त केली आहे.
निवेदन सादर करताना गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष नसीर हाश्मी, तलूका पत्रकार संघ, कुरखेडा, अध्यक्ष,सिराज पठाण, उपाध्यक्ष विजय भैसरे , सहसचिव विनोद नागपूरकर, संघटक कृष्णा चौधरी, सदस्य शिवकुमार भोयर, सुरेंद्र सहारे, कुवर लोकेंद्र शहा सयाम प्रामुख्याने उपस्थित होते व विभागीय अधिकारी यांच्या वतीने येथील नायब तहसीलदार श्रीमती बोके यांनी शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले.