December 23, 2024

“मानवतेला काळीमा फासणारी घटना; कुरखेडा येथे ८ महिन्याच्या गर्भवती महिलेवर सामूहिक अतिप्रसंग; दोन आरोपी अटकेत”

1 min read

कूरखेडा; (नसीर हाशमी); ११ ऑगस्ट: तालूका मूख्यालयापासून अगदी २ कीलोमीटर अंतरावर असलेल्या धमदीटोला येथील एका विवाहीत गर्भवती महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक दुष्कर्म केल्याची घटना घडली आहे. ८ महिन्याची गर्भवती असलेली महिला बाळंतपण करिता आपल्या माहेरी आलेली होती.

कूटूंबातील सर्व मंडळी शेतावर गेल्याची संधी साधत गावातीलच शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या भावानी अमानूष पणे या महिले वर अत्याचार केल्याची घटना काल गूरूवार रोजी रात्री ८.३० वाजेचा सूमारास घडली.
सदर घटनेतील घटने आरोपी ताराचंद कपूरडेरीया (३०) व संजय कपूरडेरीया (३२) या दोन नराधम भावाला रात्रीच कूरखेडा पोलीसानी गावातून मोठ्या शिताफीने अटक केली.
पिडीत महिलेने कूरखेडा पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करताच प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार संदीप पाटील यानी रात्रीच घटणास्थळ गाठत गावातून दोन्ही आरोपीना अटक केली व त्यांचा विरोधात भादंवि ३७६,३७६ (ड ) अन्वये गून्हा दाखल केला. पिडीत महिला ८ महिण्याची गर्भवती असल्याने वैद्यकीय परिक्षण करीता जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.
आरोपीना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्याना २ दिवसाची पोलीस कोठडी सूनावली आहे. घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांचा मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे करीत आहेत. या विकृत घटनेने परीसरात खळबळ माजली आहे.

About The Author

error: Content is protected !!