“नवजात हत्या प्रकरणी मोठा खुलासा; प्रसूतीच्या ठिकाणी पोहोचले पोलिस”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); १९ ऑगस्ट: कुरखेडा सती नदी येथे एक दिवसाचा नवजात गळा आवळून मारलेले स्थितीत मृत सापडला होता. या प्रकरणात आता नवीन खुलासा झाला असून ज्या ठिकाणी प्रसूती झाली आहे तिथपर्यंत पोलीस पोहोचण्यात यशस्वी झालेले आहेत. परंतु अद्याप ती महिला व तिचे साथीदार मिळून आलेले नाही.
प्राप्त माहितीनुसार कुरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पडक्या स्थितीत असलेल्या जुन्या इमारतीमध्ये सदर प्रसुती झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सदर ठिकाणी प्रसूतीच्या खुणा व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले असल्याची माहिती आहे. या पडक्या इमारतीत ती गेल्या अनेक दिवसापासून काही लोक वास्तव्यात असल्याची माहिती आहे. रात्री उशिरा सदर ठिकाणी पोलिसांनी पाळत ठेवली होती. एक महिला वय पुरुष सदर ठिकाणी दाखल झाल्यानंतर सापळा रचत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सदर ठिकाणी प्रसूती झाल्याबाबत त्यांनी कबुली दिली असून. कुरखेडा येथील एका महिलेने सदर प्रसूती करण्यास मदत केली असल्याची माहिती आहे. देह व्यवसायात सामील असलेल्या या महिलेला दिवस गेल्याची माहिती असून जन्म झाल्यानंतर त्या नवजात च्या गळ्याभोवती जोड्याची लेस आवळून जीव घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रसूती झालेली सदर महिला व तिची साथीदार अद्याप पसार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे.
सदर घटनेमध्ये अजून कोण कोण समाविष्ट होते याचाही तपास पोलीस करीत असून लवकरच सर्व आरोपी पकडले जातील अशी आशा व्यक्त केली जात आहे.