April 26, 2025

“कुरखेडा येथील नवजात बालक हत्या प्रकरणी एका 42 वर्षीय महिलेस अटक”

कुरखेडा; (प्रतिनिधी); १९ ऑगस्ट:
कुळखेडा येथील सती नदी पात्रामध्ये एक दिवसाचे नवजात बालक मृत स्थितीत आढळले होते. यानंतर पोलिसांनी सदर शव ताब्यात घेत उत्तरिय तपासणी नंतर गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता. 24 तासाच्या आत तत्परता दाखवत सदर घटनेचा उलगडा पोलिसांनी केला होता.
कुरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील पडक्या इमारतीमध्ये सदर प्रसुती झाल्या संदर्भातील माहिती समोर आल्यानंतर या ठिकाणी पाळत ठेवून घटनेत सहभागी असलेल्या एका 42 वर्षीय महिलेस अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार सदर महिलाही प्रसूती झालेल्या मुलीची आई असून तिने प्रसूतीनंतर आपणच सती नदी पात्रात सदर नवजात बालक फेकल्याची कबुली दिली आहे.
सदर घटनेमध्ये अर्भकास मुर्त्यू घडवून आणणे आणि विल्हेवाट लावणे करिता अज्ञात लोकांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३१५, ३१८ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल झालेल्या कलमांतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास दहा वर्षापर्यंत श्रम करावासाची शिक्षेचा प्रावधान आहे. सदर घटनेची मुख्य सूत्रधार असलेली प्रसूती करता ही लवकरच पोलिसांच्या ताब्यात येणार असल्याची माहिती आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!