“कुरखेडा नगरपंचायत च्या उपाध्यक्ष पदाकरिता आज निवडणूक”
1 min readकुरखेडा ; 8 सप्टेंबर;कुरखेडा नगरपंचायत येथील उपाध्यक्ष सौ जयश्री रासेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेले उपाध्यक्ष पद करिता आज कुरखेडा येथे विशेष सभेचे आयोजन करून उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पाडली जाणार आहे.
शिवसेना काँग्रेस युतीकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये फोडाफोडीचे राजकारण करत भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेविका जयश्री रासेकर यांना आपल्या बाजूने करून घेत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. अध्यक्ष पद मिळवून देण्याच्या ऐवज मध्ये सौ जयश्री रासेकर यांना उपाध्यक्ष पद देण्यात आले होते. पक्षाचा व्हीप झुगारून बंडखोरी केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अपात्रतेची प्रकरण जिल्हाधिकारी दाखल करून त्यांना अपात्र घोषित केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या अपात्रतेच्या आदेशाविरोधात शिवसेना (ठाकरे गट ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युतीने नागपूर येथील उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यानंतर अपात्रतेचे सदर प्रकरण जिल्हाधिकाऱ्याकडे उनिवा दूर करून निर्णय घेण्यासाठी वर्ग करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच येथील गटनेता बबलू हुसेनी यांनी अपात्रतेचे प्रकरण पुढे चालू न ठेवण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करत पक्षाची माफी मागितल्याने सौ जयश्री रासकर यांना पक्षाने माफ करत पक्षात समाविष्ट केल्याचे जिल्हाध्यक्षांच्या सहीचे पत्र सादर केले होते.
कुरखेडा येथे आज होऊ घातलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बिनविरोध बबलू हूसेनी यांची नगरपंचायत उपाध्यक्षपदी निवड होत असल्याची चर्चा आहे. तसेही संख्याबळ हे भारतीय जनता पक्षाकडे असल्याने शिवसेना (ऊबाठा) व काँग्रेसकडे उमेदवार उभा करूनही पराजय निश्चित आहे.
कुरखेडा येथील उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज ८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत येथील मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल करणे करिता वेळ देण्यात आली आहे.
दुपारी १२.३० ते २.३० वाजे पर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी व वैध नामनिर्देशन पत्राचे वाचन करण्याचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे.
वैध नामनिर्देशन पत्राची यादी वाचून झाल्यानंतर लगेच पंधरा मिनिटात नंतर पर्यंत नाव परत घेण्याची तरतूद ठेवण्यात आलेली आहे.
यानंतर एकापेक्षा अधिक वैध नामनिर्देशन प्राप्त झाल्यास व निवडणुकी संदर्भामध्ये परिस्थिती उद्भवल्यास लगेच निवडणूक घेण्याची तरतूद आहे. जर नामनिर्देशन पत्रामध्ये एकच अर्ज असला तर निवडणूक न घेता त्याला विजय घोषित करण्यात येईल अशी ही तरतुदीच्या ठेवण्यात आलेली आहे.