April 26, 2025

“युवती सेनेच्या शहर प्रमुखची झोपेतच पतीने चाकूने भोसकून केली हत्या”; हत्येनंतर पोलिस स्टेशन गाठून केले समर्पण”

कुरखेडा ; (नसीर हाशमी);१५ सप्टेंबर: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने चाकूने भोसकून हत्या केली. हत्येनंतर जीव देण्याच्या उद्देशाने येथील सती नदीत उडी घेतली. नदीत पाणी कमी असल्याने कुंभिटोला घाट पर्यंत पाण्यात चालत गेला. केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने नादी पत्रातून बाहेर निघून पोलिस स्टेशन गाठले. येथील पोलिस दयरीवर तैनात असलेले पोलिस शिपाई भास्कर किरांगे यांना हकीकत सांगत पोलिसांसमोर शरणांगती पत्करली.

हा थरार मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते. पहाटे ३ वाजताच्या सुमारास राहत यांचे वडील झोपेतून उठल्यानंतर त्यांना राहत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली आणि या घटनेची वाच्यता झाली.
पत्नीची हत्या केल्यानंतर राहत यांचा पती आरोपी तायमिन शेख याने नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना जाऊन हकीकत सांगितली. त्याला लगेच अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे मृत राहत सय्यद यांचा पती तायमिन शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आलेला होता. लग्नाआधी तो मुंबईत फुटपाथवर साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर तायमिन आणि राहत हे दाम्पत्य राहतच्या माहेरीच राहात होते.l

आरोपी हा नेहमी चारित्र्यावरून संशय घेत असल्याची माहिती पोलीस स्टेशनची दाखल केलेल्या प्राथमिक मध्ये मृतक चे वडील यांनी सांगितलेली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून सदर प्रकरणात भारतीय दंड संहिता 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास येथील पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करत आहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!