December 23, 2024

“संस्कार बँकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोळ; प्रकरण दडपण्यासाठी संचालकांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा पत्रपरिषदेत आरोप”

1 min read

“कुरखेडा व कोरची पोलिस स्टेशन येथे संस्थाचालक मनीष फाये यांच्या कडून जीवास धोका असल्याची लेखी तक्रार दाखल”

कुरखेडा; (प्रतिनिधी); १८ सप्टेंबर: कुरखेडा येथे मुख्यालय असलेल्या संस्कार क्रेडीट कॉपरेटिव्ह सोसायटी च्या कोरची शाखेत मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून संस्था चालक मनीष फाये यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करत बळजबरीने कोऱ्या कागदावर सह्या घेवून कर्ज देण्याचा खोटा प्रकरण तयार करून पतसंस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे. बँकेत झालेले गैर व्यवहार कर्मचाऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार केल्या जात असल्याचा आरोप आज कुरखेडा येथे आयोजित पत्रपरिषदेत  शुभम परिहर व मुनेश्वर पारधी व त्यांच्या परिवाराने यांनी केला आहे.
शुभम परिहार व मुनेश पारधी हे दोघे युवक संस्कार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कुरखेडा येथे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. संस्थेची कोरची येथे शाखा स्थापन झाल्यानंतर 2018 पासून ते कोरची येथील शाखा मध्ये व्यवस्थापक व कॅशियर या पदावर काम पाहत होते. बँकेत नोकरी सोबतच हे दोघेही इथे एजंटचेही काम पाहत होते शुभम परिहार हा आपल्या आईच्या नावाने एजन्सी चालवत होता व मुनेश्वर पारधी हा आपल्या भाऊ लोमेश पारधी चे नावे आर डी एजंट म्हणून काम पाहत होता. या दरम्यान मोठ्या प्रमाणात बँकेमध्ये लोकांच्या आरड्या सुरू करून बँकेला आर्थिक पाठभर देण्याचा काम यांनी केला असल्याचा त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला. बँकेचा आर्थिक फायदा सोबतच आम्ही लोकांना बँकेसोबत जोडण्याचा ही मोठ्या प्रमाणात प्रयास केल्याचा त्यांनी बोलले. दरम्यान बँकेच्या आर्थिक व्यवहार मध्ये काही तफावत आढळून आल्याने संस्थेचे संचालक मनीष फाये यांनी बँकेच्या कुरखेडा येथील मुख्यालयात बोलून आम्हाला धमकावून मारझोड करत हे पैसे आपण अफरातफर  केली असे आरोप लावून आमच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेऊन कोरे विड्रॉल फॉर्मवर आमच्या सह्या घेतल्या. आमच्या नावे बँकेतून कर्ज दाखवून सदर पैसे ची अफरातफर स्वतः करून घेतली व आम्हाला ते बँकेतील कर्जाचे पैसे आता परतफेड करण्यासाठी दबाव टाकत आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारची कर्जाची उचल न करता आमच्या नावे कर्जत सोडून बँकेतील झालेली अफरातफर आमच्या नावे दाखविण्याचा प्रकार बँक संचालक यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप शुभम परिवार व मुनेश्वर पारधी यांनी केलेला आहे.
सदर प्रकरणाची योग्य चौकशी येऊन बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्या साठी जबाबदार असलेल्या संस्थाचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत द्वारा केलेली आहे.
संस्कार बँकेच्या संचालकाकडून जीवितास धोका असून याबाबत आम्ही सविस्तर पोलीस स्टेशन कुरखेडा व कोरची येथे लेखी तक्रार दाखल केली असल्याचीही माहिती त्यांनी पत्र परिषदेत पत्रकारांना दिली.
सदर पत्रकार परिषदेमध्ये शुभम परिहार, प्रभा परिहार, मुनेश्वर पारधी, लोमेश पारधी, वेद राठोड हे उपस्थित होते.

“सदर प्रकरणात संस्थेची बाजू जाणून घेण्यासाठी संस्थेचे संस्थापक मनीष फाये यांना संपर्क केला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. संस्कार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह संस्थेचे कुठलाही भ्रष्टाचार झाला नसून सर्व आरोप खोटे असून उचललेल्या कर्जाची परतफेड न करता कर्ज बुडवण्याच्या उद्देशाने संस्थेची बदनामी करण्याचा प्रकार असून प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आपली बाजू संस्थेच्या वतीने मांडून व दोषींवर कारवाई करू असे मत व्यक्त केले आहे.”

About The Author

error: Content is protected !!