April 25, 2025

“मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कोरची – कुरखेडा दौऱ्यावर नक्षल धमकीचे सावट”; गट्टा परिसरात नक्षल्यांनी चेतावणीचे पत्रक टाकले

“सूरजागड लोहखाणींवरून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षल्यांची दुसऱ्यांदा धमकी . पुन्हा एकदा नक्षल्यांनी गट्टा परिसरात पत्रक टाकले असून यात धर्मरावबाबा, त्यांचे जावई आणि इतर काही लोहखनिशी संबंधित लोकांना धमकी वजा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.”

गडचिरोली;(प्रतिनिधी) १९ सप्टेंबर: मंत्रीपदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर कोरची सारख्या दुर्गम तालुक्यात आढावा घेण्यासाठी नियोजित केलेल्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला गट्टा परिसरात नक्षल्यांनी हस्तलिखित पत्रक टाकत अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांना धमकी देत सुरजगड उत्खनन बंद करा अन्यथा परिणामासाठी तयार राहा अशी धमकी बजा इशारा दिल्याने एकच खडबड उडाली आहे.

सूरजागड येथे सुरू असलेल्या लोह प्रकल्पावरून हिवाळी अधिवेशनात आणि त्यांनतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. मागील दोन वर्षांपासून सूरजागड येथे लोह खाणीत खनिजांचे उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे. यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशाप्रकारची धमकी देणारे पत्र गट्टा परिसरात आढळून आले. हे पत्रक पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास यांच्या नावे असून यात आत्राम यांचे जावई, त्यांचे भाऊ व कंपनीत कार्यरत काही लोकांची देखील नावे आहेत.

वर्षभरातली ही आत्राम यांना नक्षल्यांनी तिसऱ्यांदा धमकी दिली आहे. हिवाळी अधिवेशनात देखील अशाप्रकारची धमकी मिळाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आत्राम यांची सुरक्षा वाढविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु उलट सुरक्षा कमी केल्याचे कळते. त्यामुळे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे.

 

“अशा धमक्यांकडे मी लक्ष देत नाही – मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम”

‘कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्यात आता कुठे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. सूरजागड प्रकल्पामुळे हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्याचा विकास हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे अशा धमक्यांकडे मी लक्ष देत नाही’, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे.

“मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी आम्ही घेत आहो. त्यांना सद्यस्थितीत ‘झेड’ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. नक्षल्यांच्या धमकीपत्राबाबत आम्ही तपास सुरू केला आहे’ – नीलोत्पल, पोलीस अधीक्षक

गडचिरोली”

 

About The Author

You may have missed

error: Content is protected !!