April 27, 2025

“स्वच्छता ही सेवा” मोहीम अंतर्गत विविध कार्यक्रम; “स्वच्छता रन” गडचिरोली दुमदुमली”

गडचिरोली,(प्रतिनिधी) ; २३ सप्टेंबर:  ” स्वच्छता ही सेवा” ही मोहीम मोठ्या स्वरूपात जिल्हयातील गावागावांत विविध उपक्रम घेऊन राबविण्यात येत आहे. स्वच्छतेची महती ग्रामस्थांना व्हावी म्हणून जिल्हयात सर्वच ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता रन आयोजित करण्यात आली होती. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता ही सेवा ही मोहीम देशभर राबविल्या जात आहे. याद्वारे जनमानसांना शाश्वत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने दिनांक २३/०९/२०२३ रोजी ” स्वच्छता रन २०२३ ” चे आयोजन करण्यात आले. यात जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं. प्रशांत शिर्के, मुख्य लेखा व वित्त अधिकारी हेमंत ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) शेखर शेलार, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन फरेंद्र कुतीरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती, गडचिरोली अंतर्गत अधिकारी/कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

सदर स्वच्छता रन ला ग्रामपंचायत मुरखळा चे सरंपच दशरथ चांदेकर व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली. सदर स्वच्छता रन जिल्हा परिषद, गडचिरोली येथून निघून ग्रामपंचायत मुरखळा (नवेगांव) येथे भव्य कार्यक्रम घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे नियोजन फरेंन्द्र कुतीरकर, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन यांनी केले असून असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!