October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

“3 ऑक्टोंबर रोजी गडचिरोली येथे लोकशाही दिनाचे आयोजन”

गडचिरोली, (प्रतिनिधी) २८ सप्टेंबर : शासन परिपत्रकामधील सुचनानुसार लोकशाही दिन दिनांक 3 ऑक्टोंबर 2023 रोजी (मंगळवार) दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात येत आहे.

सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील. आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल, ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर दिनांक 3 ऑक्टोंबर 2023 रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-1 अ ते 1 ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहील. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा लोकशाही दिन, गडचिरोली यांनी कळविले आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!