“बँकेची आर्थिक लुबाडनुक करून बँकेवरच भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणाऱ्या शुभम परिहार व मुणेश्वर पारधी यांना अटक”
1 min read“संस्कार बँकेच्या कोरची शाखेतील आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी संस्थेच्या वतीने कोरची पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती.”
कुरखेडा; ( प्रतिनिधी); २८ सप्टेंबर: मागील आठवड्यात कुरखेडा येथे पत्रकार परिषद बोलावून संस्कार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कोरची येथे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या शुभम परिहार व मुणेश्वर पारधी यांनीच बँकेत काम करत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करून गैरप्रकार केला असल्याची तक्रार संस्कार बँकेचे संस्थापक अध्यक्ष मनीष फाये यांनी कोरची पोलीस स्टेशन येथे दाखल केली असून तक्रारीच्या आधारावर कोरची पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून शुभम परिहार व मुणेश्वर पारधी यांना अटक केली आहे.
संस्कार क्रेडिट को. सोसायटी संस्था याचे अध्यक्ष मनीष फाये यांच्या तोंडी रिपोर्ट वरून अप क्र 97 /23 कलम 409,420,501,34 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्यांची हकीकत अशी आहे कि यातील आरोपी शुभम परिहार व मुणेश्वर पारधी हे संस्था मध्ये अभिकर्ते म्हणून नेमणूकीस असताना त्यांनी खातेधारकांचे आरडी खात्याचे पैसे गोळा करून ते संस्थेमध्ये जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून खातेधारकांची 12,21,960/-रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच यातील वर नमूद आरोपीतानी इतर आरोपी नामे प्रभावती परिहार व लोमेश पारधी यांचेसह पत्रकार परिषद भरवून पेपर मध्ये फिर्यादी व संस्कार संस्थे विषयी खोटी माहिती प्रसारित करून संस्था व फिर्यादी ला बदनाम केले आहे. असे फिर्यादी वरून वरील 4 आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.