“जयंत जमकातन यांची गरुड झेप; एम.एस.सी.आय.टी. च्या परीक्षेत मिळवले १०० टक्के गुण”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी);१२ ऑक्टोबर: कुरखेडा येथील क्रिस्टल कम्प्युटर अँड टेक्निकल एज्युकेशन संस्थे मध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या एम. एस. सी. आय. टी. च्या परीक्षेत ५० पैकी ५० मार्क्स घेत १०० टक्के गुण प्राप्त करून राज्यात अव्वल येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊन विहित मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण केला. दोन महिने नियमित संस्थेतील डिजिटल ई लर्निंग द्वारे झालेल्या सदर प्रशिक्षणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये जयंत चमकातन यांनी ५० पैकी ५० गुण प्राप्त करत पाहिले स्थान प्राप्त केले आहे.
जयंत जमकातन यांच्या या उपलब्धीची सर्व स्तरावरून प्रशंसा केली जात आहे. क्रिस्टल कम्प्युटर अँड टेक्निकल एज्युकेशन या संस्थेतील आधुनिक संसाधन सुविधा व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन याच्या आधारावरच आपण शंभर टक्के गुण प्राप्त करू शकलो अशी भावना व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक संस्थेचे संचालक शाहिद हाशमी यांना दिले आहे.