December 23, 2024

“पत्रकारितेचा अंकुश कायम असावा – पोपटराव पवार”

1 min read

बारामती; १९ नोव्हेंबर: पोपटराव पवार यांनी संघटन कसं असावं ही भूमिका समजावून सांगितली. “खेड्याकडे चला” हा मूलमंत्र आवश्यक आहे. तेव्हा महानगर आणि त्यावरील ताण कमी करता येईल. भारत, इंडिया असा फरक उभा राहिला आहे. प्रजासत्ताकाचे गणराज्य कसं येईल यासाठी चारही स्तंभ काम करत असतात, मात्र पत्रकारांनी आपला अंकुश ठेवणे मोठे काम असल्याचे प्रतिपादन पवार यांनी केले.
दोन दिवसापासून बारामती येथे सुरू असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशना चा समारोप झाला. समारोप सत्राचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, समाजसेवक पोपटराव पवार, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ, शिवराज पाटील, राणा सुर्यवंशी यांची यावेळी उपस्थिती होती.
व्हॉइस ऑफ मीडियाने की तीन वर्षांत मोठे राष्ट्रव्यापी संघटन उद्दीष्टाच्या बळावर वाढत आहे. पत्रकाराची विश्वासार्हता कायम राहिली पाहिजे. स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारितेबाबत साशंकता ती दूर करण्याची मोठी जबाबदारी व्हाॅईस ऑफ मीडियावर आहे.
महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारं राज्य आहे. स्व. आर. आर. पाटील यांनी केलेल्या कामाची आणि चळवळीला दिलेल्या पाठबळाची आठवण करून देत ग्रामविकासाठी प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे असे आवाहन केले. पंचायत राज व्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.
उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात आदर्श गाव निर्मिती करिता येणाऱ्या स्थानिक अडचणी व तेथील पत्रकारांनी त्यात दिलेले मोलाचे योगदान याचा आवर्जून उल्लेख केला. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात असलेल्या गुरनोली या गावाला आदर्शगावची सभा घेण्यासाठी जातांना पोलीस व प्रशासनाने नक्षली त्यांच्या भीतीपायी न जाण्याचा सल्ला दिला होता. परंतु स्थानिक पत्रकार यांनी हिम्मत देत तेथे सभा आयोजित करून त्या गावाला आदर्शगाव योजनेत सहभागी करण्यास मोठा हातभार लावल्याचा उल्लेख केला. सदर अधिवेशनात उपस्थित पत्रकार व गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष नसीर हाशमी यांना मंचावर बोलावून त्यांच्या कामाची स्तुती केली.

सन्मान कर्तृत्वाचा !
यावेळी व्हाईस ऑफ मीडिया संस्थापक संदीप काळे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. हिंगोली टीम ला नियोजित घर प्रकल्पासाठी तसेच सर्वोत्कृष्ट शाखा चंद्रपूर, उत्कृष्ठ संघटन बांधणी धाराशिव आणि वाशिम यांना विभागून सन्मानित करण्यात आले. तसेच परभणीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, विजय चोरडिया (मराठवाडा), मंगेश खाटीक ( विदर्भ) या दोन विभागीय अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. फिरोज पिंजारी यांना राष्ट्रीय संघटन बांधणीसाठी तसेच विनोद बोरे व अर्चना बोरे दाम्पत्य, किरण गुजर, सचिन सातव, मिलिंद संघवई, हनुमंत पाटील, विशाल बाबर, अमर चोंडे, संजीव कल्पुरी, स्वप्नील शिंदे यांनाही सन्मानित करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी पत्रकारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक किट वाटप शुभारंभ झाला.

About The Author

error: Content is protected !!