“न्युमोनिया जनजागृतीसाठी जिल्हात राबविण्यात येणार साँस मोहिम”
1 min readगडचिरोली,(जिमाक) दि.21: 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांमधील न्युमोनिया प्रतिबंध बचाव व उपाययोजना करण्यासाठी सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृती करण्याकरीता राज्यात सॉस हि मोहिम दिनांक 12 नोव्हेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यत राबविण्यात येणार आहे. न्युमोनिया हा आजार फुफुसांना तीव्र स्वरूपात होणारा तसेच नेहमी दिसून येणारा सर्व सामान्य संसर्ग आहे. हा संसर्ग झालेल्या बालकांना खोकला येणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, छाती आत ओढणे, ताप येणे अशी लक्षणे असतात. न्युमोनिया आजाराची लक्षणे ओळखून तात्काळ उपचार घेतल्यास हा आजार पुर्णपणे बरा होतो. सध्या भारतात दर वर्षी न्युमोनिया मुळे मोठ्या प्रमाणात बाल मृत्यु होत असतात त्यांचे प्रमाण २०२५ पर्यत ३ पेक्षा कमी करावयाचे आहे.
सदर मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, आयुषी सिंह यांचे हस्ते
महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आला. बालमृत्यु होण्याकरीता न्युमोनिया हे प्रमुख कारण असल्यामुळे बालमृत्य टाळण्याकरीता सदर मोहिम प्रभावीपणे राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली यांनी मार्गदर्शन केले.
तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली डॉ. दावल साळवे, यांनी प्रास्ताविकपर मार्गदर्शनामध्ये न्युमोनिया आजार टाळण्यासाठी लहान बालकांना ६ महिने निव्वळ स्तनपान करावे. व आपल्या बाळाचे ठराविक वयोगटात (पहिला डोज ६ आठवडे दुसरा १४ आठवडे, बुस्टर डोज ९ व्या महिन्यात ) न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन घेतले आहे काय याची खात्री करावी. बाळाचे आरोग्य केंद्रात जाऊन संपुर्ण लसीकरण करून घ्यावे. सदर मोहीमेत आशा घरोघरी जाऊन समुपदेशन करणार आहे, त्यावेळी त्या “न्युमोनिया नाही तर बालपन सही” या घोष वाक्याचा वापर करणारं आहे. तर सर्व नागरिकांनी न्युमोनिया आजाराचा प्रतिबंध करुन वेळेत उपचार करावा व न्युमोनिया आजाराविषयी असलेले गैरसमज व चुकीच्या कल्पना दुर करुन न्युमोनिया प्रतिबंधाकरिता आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
सदर मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी. वैद्यकिय अधिकक्ष, महिला व बाल रुग्णालय गडचिरोली, डॉ. माधुरी किलनाके, निवासी बाहयरुग्ण वैद्यकिय अधिकारी, डॉ. बागराज धुर्वे, बालरोग तज्ञ, डॉ.प्रशांत पेंदाम, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. विनोद म्हशाखेत्री, जिल्हा साथरोग अधिकारी, डॉ. रूपेश पेंदाम, तालूका आरोग्य अधिकारी, तालुका गडचिरोली, अमित साळवे, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली, महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी तसेच गडचिरोली शहरी विभागातील आशा कार्यकर्त्या व लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विनोद सोनकुसरे, आ. सहा यांनी केले व आभार प्रदर्शन माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल हुलके यांनी केले.