“विदर्भाच्या जनतेच्या हक्कासाठी “करू” किंवा “मरू”
1 min read“विदर्भाच्या संपूर्ण विकासासाठी एकमेव पर्याय म्हणजे वेगळा विदर्भ होय, याकरिता आता लढू किंवा मरू असा दृढ संकल्प यावेळी करण्यात आला.”
कुरखेडा; २ डिसेंबर:
विकास, निधी, विदर्भातील तरुणांच्या हाताला रोजगार, शेतकऱ्यांना सिंचन व विजेची हमी, रस्ते व हक्काच्या नोकऱ्यांवर अधिकार मिळवून विदर्भाचे मागासलेपण नवीन विदर्भ राज्य निर्मिती मुळे दूर होऊ शकते. यामुळेच विदर्भाच्या विकासासाठी एकमेव पर्याय म्हणजे वेगळा विदर्भ राज्य निर्मिती असल्याची ग्वाही समितीच्या वतीने आयोजित संकल्प यात्रेच्या शुभारंभ प्रकरणी कुरखेडा तालुक्यातील नान्ही येथे विदर्भवादी नेत्यांनी मत प्रगट केले.
विदर्भ राज्याची धग आता पेटली असून 31 डिसेंबर पर्यंत “विदर्भ घेऊ किंवा जेल जाऊ” तसेच गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार निर्मिती घेऊन बेरोजगारांचे स्थलांतर थांबवू अशी भूमिका घेऊन विदर्भ जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांसह कुरखेडा तालुक्यातील नान्ही येथून संकल्प यात्रेला शुभारंभ करून रणसिंग फुंकले आहे.
वेगळा विदर्भ राज्य निर्मितीची संकल्प यात्रा ही भविष्यात गडचिरोली जिल्ह्यासाठी फलदायी ठरणार आहे.
नागपूर करारा वेळी झालेला विदर्भावरचा अन्याय वेगळा विदर्भ मिळवूनच पूर्ण होणार तसेच विदर्भातील शेतकरी गोरगरीब व बेरोजगारांना न्याय मिळणार आहे.यावेळी अरुण केदार पूर्व विदर्भ अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती मुकेश मासुरकर युवा आघाडी अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती डॉ.रमेश गजबे माजी मंत्री तथा कोर कमिटी सदस्य ,तात्या साहेब मत्ते कोर कमिटी सदस्य ,ज्योती खांडेकर , माधुरी चौहान,अशोक पाटील ,मौदेकर राजेंद्रसिंह ठाकूर उत्तर गडचिरोली जिल्हाध्यक्ष , घिसु पा.खुणे उपाध्यक्ष जिल्हा गडचिरोली , रामचंद्र रोकडे ता.अध्यक्ष कुरखेडा ,मूत्ताजी दुर्गे कुरखेडा शहर अध्यक्ष ,नेपाल मारगाये यु.आ.अध्यक्ष ता.कुरखेडा ,हेमंतकुमार मरकाम सो. मी.प्रमुख ता.कुरखेडा ,मदनसिंग ब्रम्हनायक,शोभाराम सोनजाल,शोभितराम सोनजाल, रामचंद्र कोडाप ,नितेश कोडाप,,शिवलाल ब्रम्हनायक, ठाकूरराम कोसरे ,बुधराम सहाळा विदर्भ वादी जनता मोठ्या संख्येत उपस्थित होते.