“साहेब गेल्यावर काढून रॉयल्टी रेतीची; कुरखेडा येथे कर्तव्यावर असलेल्या आयएएस ओमकार पवार यांची धास्ती”
1 min readकुरखेडा; ६ जानेवारी: राजरोसपणे अवैधरित्या रीती उपसा करून शेतीतील गाळ काढण्याचा देखावा करणाऱ्यांच्या मनात येथील तहसीलदार आयएस ओमकार पवार यांची धडकी भरली आहे. साहेब कुरखेडा येथे नियुक्त आहेत तोपर्यंत रॉयल्टीस काढायची नाही, असा निर्णय या माफिया गिरोहने घेतले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
या प्रकरणावरून असं लक्षात येते की अधिकारी प्रामाणिक आणि शिस्तबद्ध असला की शासनाच्या संपत्तीचे संरक्षण व चोरीस व्यवस्थितपणे आळा बसतो. तालुक्यात सती नदी शेजारी असलेल्या सातबाराचा फायदा घेत जाती नदी पात्रातून रेती उपवास करण्याचा डाव असलेल्या रेतीमाफीया यांनी यावर्षी सुद्धा जिल्हाधिकारी कडून सदर गाळ काढण्याच्या नावावर परवानगी मिळवून घेतलेली आहे. परवानगी मिळाल्यानंतरही या ठिकाणी उपसा करण्याची हिंमत सध्या तरी हे माफिया करत नसल्याचे चित्र आहे. त्याचे कारण आहे येथे नियुक्त असलेले आयएएस अधिकारी ओमकार पवार. प्रामाणिक व शिस्तबद्ध प्रतिमा असलेले पवार हे आपल्याला मनमानी करू देणार नाहीत व नियमानुसार आपल्याला रेती उत्खन करावे लागेल व शेतीतील गडाच्या सीमांकन प्रमाणेच उपसा करावा लागेल ही गोष्ट लक्षात येताच येथील खरेदी माफिया लोकांनी आपले रेती उत्खनन लांबणीवर टाकले असल्याचे समजते.
सदर शेतीच्या गाळ काढण्याच्या प्रस्तावनात तयार करतांनी हे नियोजन पद्धतीने एखाद्या शेतकऱ्याच्या शोध घेतात त्याचा या पूर्ण प्रक्रियेची तीळ मात्र ही संबंध नसतो. ज्याच्या नावावर ही संपूर्ण प्रक्रिया केली जाते त्याला या संपूर्ण प्रक्रियेत अंधारात ठेवून मोठ्या प्रमाणात मलाई खाण्याचा काम हे रेतीवाख्या करतात. एखाद्या घटनेमध्ये प्रामाणिक चौकशी झाली आणि कार्यवाही झाली तर हे रेती माफिया सहजतेने तिथून निसटून जातात व त्या शेतकऱ्याला या संपूर्ण चौकशीला समोर जावे लागते. हे सर्व प्रक्रिया वरून ते खाली पर्यंत असलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत व्यवहार करून केली जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. शासनाने जीआर काढत शेतकऱ्यांना होणाऱ्या रेतीच्या त्रासापासून मुक्ती देण्याचा मुख्य उद्देश होता परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये हे रेतीमाफी या एखादा घाट लिलाव करून घेतल्यासारखा रितीचा उत्साह करतात व मोठ्या प्रमाणात ती रेती विकून मालामाल होत असल्याची चित्र आहेत.
अशातच एखादा प्रामाणिक अधिकारी त्या ठिकाणी कर्तव्यावर असला की हे प्रीती माफिया हेतू पुरस्कर प्रक्रिया लांबणीवर टाकतात व अधिकारी बदलला की परत आपल्या कामावर लागतात अशीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे.