” ३७ गावातील महिला व नागरिकांच्या उपस्थितीत मालेवाडा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न”
1 min read“जिल्हा परिषद शाळा, मालेवाडा येथील पटांगणावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबिरात आमदार श्री कृष्णाजी गजबे यांची विशेष उपस्थिती”
कुरखेडा; १ जानेवारी: तालुक्यातील मालेवाडा येथे ३७ गावातील महिला व नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
कुरखेडा तालुक्याचे नवनियुक्त तहसीलदार ओमकार पवार (भा.प्र.से.) यांच्या नवसंकल्पनेतून या कार्यक्रमाचे संपूर्ण व्यवस्थापन हे १०० टक्के महिला सहभागाने यशस्वीरीत्या संपन्न झाले.
व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी तसेच सत्कारमूर्तीमध्ये देखील १०० टक्के महिलांचा सहभाग होता. अश्या प्रकारचा आगळा वेगळा उपक्रम राबवून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणाऱ्या मा.
श्री. ओमकार पवार यांनी तालुक्यातील समाजासमोर एक आदर्श स्थापित केला आहे. महिलांमधील आत्मविश्वासाला या उपक्रमामुळे तालुक्यात वेगळी चालना मिळाली आहे.
महिला प्रत्येक क्षेत्रात समोर येण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ ख-या अर्थाने महिलांना उपलब्ध व्हावा, यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामिन व शहरी भागातील महिला लाभार्थ्यांना
एकाच छताखाली विविध शासकिय योजनांचा लाभ मिळावा या करिता मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबिरांचे आयोजन मालेवाडा येथे करण्यात आले होते. महिलांनी मोठ्या प्रमाणात केंद्र व राज्य शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार श्री. कृष्णाजी गजबे विधानसभा सदस्य आरमोरी यांनी केले.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबिर मालेवाडा येथे पार पडला यावेळी शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून महिला ग्रा. प. मालेवाडा येथील सरपंच श्रीमती अनुसया पेंदाम, ग्रा. प. अंगारा येथील सरपंच श्रीमती रेखा कोकोडे, ग्रा.प. रानवाही येथील सरपंच श्रीमती जास्वंदा सयाम उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापक सरोजा मारेकरी, आदर्श विद्यार्थिनी आणि विविध शासकीय विभागांच्या महिला अधिकारी / कर्मचारी उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाला श्री. धीरज पाटील (संवर्ग विकास
अधिकारी), श्री. गणेश कुकडे (महिला व बाल विकास अधिकारी), श्री. संजय रामटेके ( तालुका कृषी अधिकारी), नायब तहसीलदार श्री. राजकुमार धनबाते, श्री. निखील पाटील, यांसह विविध विभागांचे प्रमुख तसेच मालेवाडा येथील शिबिरामध्ये कुरखेडा तालुक्यातील 37 गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आतापर्यंत तालुक्यातील 31450 महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ”
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबिर च्या माध्यमातून तालुक्यातील 31450 महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र मालेवाडा आरोग्य विभागामार्फत निशुल्क टी. बी, सिकल सेल व सामान्य आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांना मोफ़त आभा कार्ड, गोल्डन कार्ड, आधार कार्ड, शिधा पत्रिका इ. चे वाटप करण्यात आले.