“तर स्वतंत्र भारताचे गुलाम नागरीक म्हणून जगावे लागेल” – विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार
1 min read“गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस इंडिया /महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आज चामोर्शीत जाहीर सभा पार पडली.”
“महाविकास आघाडीचे प्रचार सभेतून सामूहिक शक्तिप्रदर्शन”
चामोर्शी; ४ एप्रिल; (स्थानिक प्रतिनिधी) : देशांतील प्रत्येक नागरिकांला समान हक्क व जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी लोकशाही पुरस्कृत संविधान लिहून देशाला उत्तम घटना दिली. माञ सध्याच्या केंद्रातील मनुस्मृति विचारांचे सरकारने देशांतील नागरिकांची लूट करुन, धर्मांधतेच्या नावावर दिशाभूल करीत व्यापारी हित जोपासून देशाच्या नागरिकांचे रक्षण कवच असलेल्या पवित्र संविधान पूर्णतः बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणुन जगावे लागेल.असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रचारार्थ चामोर्शी येथे आयोजीत सभेत बोलत होते.
आयोजीत प्रचार सभेस प्रमूख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आ. रोहित पवार, आ. सुनील भुसारा, रायुकॉ प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, ॲड. राम मेश्राम, गडचिरोली रा. कॉ. जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवर, चंद्रपूर रा कॉ. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, काँग्रेस महीला आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. कविता मोहरकर, संजय ठाकरे, लोमेश बुरांडे, राजू आत्राम, विजय गोरडवार, कबिरदास आभारे, अशोक तिवारी, सुरेश नैताम प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशांतील शेतकरी, कामगार, युवक नोकरदार वर्ग व सर्व नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण यामुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असुन आता विरोध करणार्या विरोधकांना संपविण्याचा डाव आखला जात आहे. खते, जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅस यात प्रचंड दरवाढ व जीएसटी च्या माध्यमातून जनतेची लूट केल्या जात आहे. अश्या निष्ठूर सरकार विरुद्ध आता पेटून उठून देशातील संविधान टिकविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. देश सुरक्षित नाही, देशांतील महीला सुरक्षित नाही, महीला खेळाळूचे शोषण करणारे मोकाट फिरत आहे. अशी अवस्था देशाची झाली आहे.तर विद्यमान खासदार अशोक नेते हे संसदेत मौन धारण करून बसतात अश्या मौनी बाबाला उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार देतात हि हास्यास्पद बाब असल्याची टीका विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.तर
देशातील भाजप सरकार हे आदिवासी, शेतकरी, कामगार, युवक विरोधी सरकार असुन देशाच्या शेतकऱ्यांना आजवर हमीभाव दिला नाही. पेपर फुटीमुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. माञ सरकार कारवाईकडे पाठ फिरवीत आहे. देशांत तानाशाही सुरु असुन पक्ष व कुटुंब फोडल्या जात असल्याचे आ. रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
मार्गदर्शनपर बोलताना इंडिया आघाडीचे अधिकृत लोकसभा उमेदवार डॉ. नामदेव किरसान म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नोकरीचा त्याग केला . समाजात राहून उच्च शिक्षण घेऊन जर समाजाचा लाभ होत नसेल तर अशा पदाची काय गरिमा उरणार.. देशात सर्वत्र राजांचा पसरवून दबाव तंत्रातून सत्ता काबीज करणारा भाजप हा पक्ष देशाला बुडविणारा असून याचे प्रतिनिधी म्हणून जे खासदार निवडून गेलेत त्यांनी आजवर केवळ संसदेत मोन धारण करून मान हलवणे पलीकडे काहीच कार्य केले नाही. अशा निष्क्रिय खासदारांना घरचा रस्ता दाखवून मला सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन उपस्थितांना लोकसभा उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विजय गोरडवार, प्रास्तविक रा.कॉ.जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारापवार तर आभार राजू आत्राम यांनी मानले. या प्रसंगी चामोर्षी तालुक्यांतील व परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती.