“निवडणूक निरीक्षक पराशर यांची आरमोरी व चिमुर विधानसभा मतदार क्षेत्राला भेट”
1 min readगडचिरोली, ४ एप्रिल (जिल्हा प्रतिनिधी): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक अनीमेष कुमार पराशर यांनी काल आरमोरी व आज चिमुर विधानसभा मतदार संघात भेट देवून निवडणूक व्यवस्थेच्या तयारीची पाहणी केली.
12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल रोजी होत आहे. याअंतर्गत आरमोरी विधानसभा मतदार संघातील देसाईगंज तालुक्यातील तसेच आज चिमुर तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देवून श्री पराशर यांनी पाहणी केली. त्यांनी देसाईगंज व चिमुर येथील स्ट्रॉंग रूमला भेट देवून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती मानसी (आरमोरी), किशोर घाडगे (चिमुर) तसेच तहसिलदार प्रिती, डुडुलकर, प्रशांत गड्डम (कोरची), श्रीधर माने व इतर अधिकारी उपस्थित होते.