December 23, 2024

“अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग”

1 min read

प्रतिनिधी; कुरखेडा (गडचिरोली) : शाळेत शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकानेच शाळेतील १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढून विनयभंग केल्याचा आरोपावरून शिक्षकाविरोधात विनयभंग व पोक्सोच्या विविध कलमान्वये कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
घनश्याम मंगरू सरदारे ( वय ४७) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, तो तालुक्यातीलच एका जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत आहे. आरोपी शिक्षक सरदारे याने
शाळेतीलच एका अल्पवयीन विद्यार्थिनीला दोनपानी प्रेमपत्र दिले. तसेच तिचा शरीराचा मुका घेणे, चिमटे घेणे अशी छेड काढत असल्याचा आरोप करीत सोमवारी (१ एप्रिल) सायंकाळी पालकांनी मुलगी व गावकऱ्यांसह कुरखेडा

पोलीस स्टेशन येथे पोहोचून तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात भादंवि
३५४ (अ) ८,१०,१२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. आरोपी शिक्षक फरार असल्याची माहिती आहे.
प्रकरणाचा तपास कुरखेड्याचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक अवचार करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!