“भारताला विश्वगुरू बनवण्याकरिता मोदीचे हात बळकट करा आरमोरी विधानसभा क्षेत्र प्रमुख सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडीवार यांचे प्रतिपादन”
1 min readकुरखेडा; प्रतिनिधी; ४ एप्रिल: भारताला विश्वगुरू बनविण्याकरिता पुन्हा एकदा मोदी सरकारची भारत देशाला आवश्यकता असल्याने कार्यकर्ता बंधूनी मोदीचे हात बळकट करण्याकरिता गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय उमेदवार अशोक नेते यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे याकरिता कार्यकर्त्यांनी आपलीच निवडणूक आहे समजून मैदानात रण फुकावे असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्र प्रमुख सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडीवार यांनी केले ते कुरखेडा येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात आयोजित भारतीय जनता पार्टी-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -आरपीआय-पिरिपा महायुतीचे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री.अशोक महादेवराव नेते यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ते बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी यांच्याशी संवाद करताना बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने मंचावर आमदार कृष्णाजी गजबे,लोकसभा प्रभारी तथा निवडणूक प्रमुख प्रकाश सावकार पोरेड्डीवार , भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, ,जिल्हा सचिव गणपत सोनकुसरे, सहकार नेते वसंतराव मेश्राम,ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, अल्पसंख्याक जिल्हा मोर्चा जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, अनुसूचित जाती जिल्हा मोर्चाॲड.उमेश वालदे,कोरची भाजपा तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, नंदू पंजवानी, गुड्डू अग्रवाल भाजपा शहर अध्यक्ष,सागर निरंकारी, तालुका महामंत्री डॉ,मनोहर आत्राम, विनोद नागपूरकर , चंद्रकांत चौके, भाजपा महिला तालुका अध्यक्षा जागृती जोडे महिला तालुका महामंत्री जयश्री मडावी, कल्पना माडवे उपस्थित होते.
यावेळी आमदार ,कृष्णा गजबे यांनी प्रधानमंत्री यांच्या सबका साथ ,सबका विकास और सबका प्रयास च्या माध्यमातून भारताची विकासाकडे जलद गतीने वाटचाल सुरू असून राज्य व केंद्रातुन अनेक विकास कामे आपल्या विधान सभेत चालू आहेत.ज्यात रेल्वे चा प्रश्न असेल,सिंचनाचा प्रश्न असेल,रस्त्यांचे प्रश्न असेल,केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालय, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प असे अनेक कामे जोमात सुरू आहेत एवढंच नाहीतर रेल्वे सर्व्ह लाईन चे सुद्धा काम मंजूर केलेले आहे. याबरोबरचं वडसा गडचिरोली रेल्वे लाईन चे काम प्रगती पथावर सुरु आहे विद्युत समस्या मिटवण्याकरिता शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत .
जे काम साठ वर्षात काँग्रेसनी केले नाही ते काम यशस्वी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी या दहा वर्षात ऐतिहासिक निर्णय घेत देशाला पुढे नेण्याचं काम केले.त्यांनी पाचशे वर्षाचा राम मंदिराचा प्रश्न असेल,तिन तलाख,काश्मिर ३७० धारा, हर घर जल प्रत्येक लाभार्थ्यांना घरकुल, शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या वतीने १२००० आर्थिक मदत, हेक्टरी 20 हजार रुपये शेतकऱ्यांना बोनस असे अनेक निर्णय घेत केलेल्या कार्य कर्तुत्वावर पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनतील व अब कि बार चारसौ पार विजय संकल्प करत मोदीजी कि गॅरंटीसाठी पुन्हा कमळ फुलवा व गडचिरोली चिमूर लोकसभे क्षेत्राचे उमेदवार अशोक नेते यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन गजबे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले तर आभार जिल्हा सचिव गणपत सोनकुसरे यांनी मानले. यावेळी बहुसंख्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख महिला वर्ग ,युवा वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.