“कुरखेडा तालुका कार्यकारिणीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मर्फतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर”
1 min read” व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कठोर कारवाही करण्याची मागणी”
कुरखेडा; २७ जून:
मुल येथील दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष संजय रघुनाथ पडोळे यांना वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केल्याचे कारणावरून काँग्रेस नेते प्रकाश मुरलीधर मारकवार यांनी भ्रमणध्वनीव्दारे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी संजय पडोळे यांनी पोलीसांत तक्रार दिली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे . पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याने प्रकाश मारकवार यांचेवर कठोर कारवाईची मागणी करीत व्हाईस ऑफ मिडीया कुरखेडा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने घटनेचा निषेध नोंदवित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे .
काँग्रेस नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे यांना दिलेली धमकी ही वृत्तपत्र स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी असुन पत्रकार आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावुन घेणारी असल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर नेत्याकडुन झालेल्या बेकायदेशीर कृत्याचे आम्ही व्हॉईस ऑफ मिडीया कुरखेडा तालुक्यातील सर्व पत्रकार जाहीर निषेध नोंदविला आहे. सोबतच काँग्रेस नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे यांना जिवे मारण्याच्या दिलेल्या धमकीमुळे त्यांचेवर फौजदारी गुन्हयाची नोंद करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडिया तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोलीने निवेदनातून केलेली आहे. सदर निवेदन सादर करतांना नसीर हाशमी, गीतेश जांभुळे, शालिकराम जनबंधू, महेंद्र लाडे, दीपक धारगाये, चेतन गाहाने, ताहिर शेख, विनोद नागपूरकर, शिवा भोयर, खेमराज धोंडणे आदी पत्रकार उपस्थित होते.