“व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांनी जात पडताळणीसाठी अविलंब अर्ज करावे”

गडचिरोली,दि.27(जिमाका): सन 2024-25 मध्ये ज्यांना मागास प्रवर्गातून व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी जात पडताळणी समितीकडे विहीत नमून्यात आवश्यक कागदपत्रासह /पुराव्यासह त्वरीत अर्ज सादर करावे. तसेच ज्यांचे अर्ज त्रुटीत आहेत त्यांनी आवश्यक पुराव्यासह त्रुटी पूर्तता करीता 2 जुलै 2024 रोजी कार्यालयीन वेळेत आवश्यक दस्ताऐवजासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय.चौक, एल.आय.सी. रस्ता, कॉम्प्लेक्स, गडचिरोली या कार्यालयात उपस्थित होऊन दस्तावेज सादर करण्याचे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त़ देवसुदन धारगावे यांनी केले आहे.