October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

ट्रकच्या धडकेत पाचवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

”वसा येथील घटना ; ट्रक चालकावर गुन्हा दाखल”

गडचिरोली, ०४ जुलै : नवीन शैक्षणिक सत्राच्या तिसऱ्याच दिवशी शाळेतून सायकलवरून घरी परतताना पाचवीच्या विद्यार्थ्याला मालवाहू ट्रकने चिरडले. ही हृदयद्रावक घटना ३ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता आरमोरी रोडवरील वसा येथे घडली.

ऋतुराज प्रशांत शिवणकर (११) रा. वसा असे जागीच ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. शिक्षणाच्या ओढीने ऋतुराज हा पहिल्या दिवशीपासूनच वसा जवळच्या पोर्ला येथील शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत जाऊन अवघे दोनच दिवस उलटले होते. गप्पागोष्टीत शाळेतील तिसराही दिवस संपला. सायंकाळी सुटी झाल्यानंतर एका मित्रासोबत तो स्वतः सायकल चालवत गावाकडे निघाला. पोर्लापासून अवघ्या एका किमी अंतरावर गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर त्याचे गाव. गावाच्या फाट्याजवळ पोहोचला. आता गावाच्या रस्त्याने सायकल वळवणार तोच गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने मागील बाजूने सायकलला धडक दिली. यात त्याचा मित्र बाजूला फेकला गेला तर ऋतुराज हा ट्रकच्या चाकाखाली आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पोहोचताच गर्दी उसळली. लगेच पोलिसांनाही कळविण्यात आले. आरमोरी पोलिसांनी ट्रकचालकास अटक करून त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत शिवणकर यांना ऋतुराज हा एक मुलगा होता व त्यापेक्षा लहान मुलगी आहे. आपल्या मुलाला ट्रकने चिरडल्याची माहिती होताच शिवणकर कुटुंब शोकसागरात बुडाले. एकुलत्या मुलाच्या जाण्याने नातेवाईकांच्याही अश्रूचा बांध फुटला.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!