April 26, 2025

नक्षल्यांकडून आयईडी स्फोट ; दोन जवान किरकोळ जखमी

भामरागड, ०६ जुलै : तालुक्यातील धोडराज परिसरातून नक्षलविरोधी अभियान राबवून परत येत असताना धोडराज भामरागड मार्गाजवळील पुलाजवळ नक्षलविरोधी सी-६० पथकाच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट केला. मात्र सुदैवाने हा स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात दोन पोलिस जवान किरकोळ जखमी झाले.

सी-६० चे जवान रस्त्यावर शोध अभियान करत असताना धोडराज-भामरागड पुलाजवळ नक्षलवाद्यांनी लोखंडी क्लेमोरने हा स्फोट केला. ही आयईडी निकामी करण्यात पोलिस जवानांना यश आले. सदर घटनेत दोन पोलीस जवानांच्या हातावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा घातपाताचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. परिसरात पुढील शोध मोहीम सुरू आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!