गडचिरोली जिल्हयासाठी 2023 मधील स्थानिक सुट्टया जाहीर
1 min readगडचिरोली,(जिमाका)दि.17: महाराष्ट्र शासन राजकीय आणि सेवा विभागाच्या दिनांक 16 जानेवारी 1958 च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांना प्रदान झालेल्या अधिकारानुसार त्यांनी सन 2023 या वर्षाकरीता स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. जागतिक आदिवासी दिन(बुधवार) 9 ऑगस्ट 2023, पोळा,(दुसरा दिवस) शुक्रवार,15 सप्टेंबर 2023, आणि दिवाळी (दुसरा दिवस) सोमवार,13 नोव्हेंबर 2023,रोजी गडचिरोली जिल्हयाकरीता स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश गडचिरोली जिल्हयातील दिवाणी फौजदारी न्यायालये,अधिकोष (बँक) यांना लागु होणार नाही असे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कळविले आहे.