December 23, 2024

“सर्पदंशाने युवकाचा मृत्यू ,; पर्यायी मार्गाने उपजिल्हा रुग्णालय पोहोचण्यास विलंब झाल्याची खंत”

1 min read

“सती नदीवर पूल असता तर वाचला असता जीव; पर्यायी मार्गाचा गंभीर रुग्णांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र”

कुरखेडा ; (चेतन गाहाने) जुलै ९ : तालुक्यातील सावरगांव (येगंलखेडा) येथे शेतात रोवणीचे काम करतांना सर्पदंश झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्या युवकाचे नाव करण संजय उईके (वय २२) रा.बोरटोला भरनोलि ता. अर्जुनी मोर असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, करण उईके हा युवक कुरखेडा तालुक्यातील सावरगाव (येंगलखेडा) येथे शेती कामानिमित्त मजुरी करण्यासाठी आला होता. दरम्यान सोमवार ८ जुलै रोजी शेतात रोवणीचे काम करतांना त्याला सर्पदंश झाला. लगेच  त्याला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले , मात्र रुग्णालयात पोहोचण्याधीच त्याला मृत्युने कवटाळले होते. तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पर्यायी मार्गाने पोहोचण्यास लागलेल्या विलंवामुळेच करणचा मृत्यू झालं. काही क्षणांपूर्वी पोहचले असते तर रुग्ण दगावला नसता असे डॉक्टरचे म्हणणे होते. युवा शेतकऱ्याचा अशा मृत्युने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नदीवर पूल असता तर वाचला असता जीव”

करन ल सर्पदंश झाल्याने रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. मात्र पुलाभावी पर्यायी मार्गाने ते पोहचण्यास अधिक विलंब लागणार असे सांगण्यात आल्याने सहकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता खासगी वाहनाने कुरखेडा येथे हलविले. मात्र पर्यायी मार्गाचा अधिकचा अंतर आणि लागणारा अधिकचा वेळ यामुळे रुग्णालयात पोहचण्यास विलंब झाला आणि करणचां मृत्यू झाला, सती नदीवर पूल असता तर जीव वाचला असता असे बोलले जात आहे.

कुरखेडा येथील सती नदीवरील जुना पूल पडून नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान शेजारीच नदीतून रपटा तयार करण्यात आला होता मात्र नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने ४ जुलै रोजी वाहून गेला. त्यामुळे आता कुरखेडा तालुका मुख्यालय गाठण्यासाठी आंधळी – वाघेडा – मालदुगी – गोठणगाव फाटा असा पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र हे अंतर आता अधिक असल्याने या मार्गाने तालुका गाठण्यासाठी अधिकचा वेळ लागत असल्याने याचा फटका गंभीर रुग्णांना बसत आहे. वेळेवर रुग्ण रुग्णालयात दाखल होऊ शकत नाही अशी ओरड नागरिकांची आहे.

About The Author

error: Content is protected !!