15 जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

गडचिरोली, जुलै ९: (जिमाका): महिला व बाल विकास विभाग महिलांचा समस्यांचे निराकरण व्हावे व त्यांच्या समस्यांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येत आहे. महिलांचा कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तिक समस्या, गाऱ्हाणी, अडीअडचणी ऐकुण त्यांचे निवेदन स्विकारण्यात येईल. अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरक क्रमांक 1, खोली क्रमांक 26,27 कॉम्पलेक्स, गडचिरोली या कार्यालयात निशुल्क प्राप्त होईल. दिनांक 15 जुलै 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे कार्यालयातील सभागृहात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पिडीत महिलांनी आपले अर्ज सदर कार्यालयात सादर करावे. याबाबत सर्व महिलांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!