“भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी अहेरी येथे घेतला लोकसभा निवडणुकीचा आढावा”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १०
अहेरी : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली अहेरी विधानसभा तालुकानिहाय बैठकीच्या आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मूलचेरा व एटापल्ली तालुका बैठक तालुका निहाय शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आले.
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संघटनात्मक चर्चा करून लोकसभा निवडणुकीमध्ये बूथ निहाय झालेल्या मतदानाचा आढावा घेण्यात आला. ज्या बुथवर भारतीय जनता पक्षाला कमी प्रमाणामध्ये मत मिळालेले आहेत त्या बुथवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून बूथ सशक्तिकरण करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
अहेरी विधानसभा भाजपा कार्यसमिती बैठक राममंदिर, आलापल्ली येथे आयोजित करण्यात आली. बैठकीला ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी आघाडी बाबुराव कोहळे, प्रदेश सदस्य रवी ओल्लालवार, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री भास्कर बुरे उपस्थित होते.
प्रशांत वाघरे यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील भामरागड, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा व एटापल्ली तालुका निहाय लोकसभा निवडणूक मध्ये भारतीय जनता पक्षाला बूथ निहाय मिळालेल्या मताचा आढावा घेतला.
प्रशांत वाघरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक मार्गदर्शन करताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे. परंतु या पराभवाला कार्यकर्त्यांनी खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या नेतृत्वात अहेरी विधानसभा मध्ये विजय भारतीय जनता पक्षाचाच होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पामध्ये सरकारच्या वतीने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, कृषी पंप थकीत बिल माफप, मोफत वीज, विद्यार्थिनींकरिता मोफत शिक्षण, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी, जनसामान्याच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केले. सादर केलेल्या अर्थसंकल्पाची माहिती बूथनिहाय बैठकीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवा त्याचबरोबर बूथ सशक्तीकरण करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विनोद अक्कपलीवार, दामोदर अरगेला, मच्छीमार प्रकोष्ठ अध्यक्ष मोहन मदने, मूलचेरा तालुकाध्यक्ष संजीव सरकार, भामरागड तालुका अध्यक्ष अर्जुन आलम, जिल्हा सचिव विजय नल्लावार, सतीश गोठामवार, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री शालिनी पोहनकर, पोशालू चूधरी, रहिमा सिद्दिकी, अभिजीत शेंडे, अशोक आलाम, राजेश ठुसे, पदाधिकारी/ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.