April 26, 2025

देसाईगंज येथील पत्रकार जितेंद्र परसवाणी यांच्या कारचा भीषण अपघात; २ जागीच ठार, ३ गंभीर

जितेंद्र परसवाणी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आज दुपारी नागपूरला हलविण्यात आले.

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क , जुलै १०:

गडचिरोली,: नागपूरहून लग्न समारंभ आटोपून परत येत असताना ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने दोन जण ठार, तर तिघे जखमी झाले. ही घटना आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास नागभिड-ब्रम्हपुरी मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ घडली. दिलीप परसवाणी(५५) व सौ.महेक जितेंद्र परसवाणी(४२) दोघेही.रा.देसाईगंज, जि.गडचिरोली अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात जितेंद्र परसवाणी (४५) आणि त्यांची दोन मुले गौरव परसवाणी(१७) व उदय परसवाणी(१०) हे जखमी झाले आहेत.

देसाईगंज येथील पत्रकार जितेंद्र परसवाणी हे पत्नी महेक, दोन मुले गौरव व उदय आणि नातेवाईक दिलीप परसवाणी यांच्यासह नागपूरला नातेवाईकाच्या विवाहासाठी गेले होते. विवाह समारंभ आटोपून मध्यरात्री परत येत असताना नागभिड-ब्रम्हपुरी मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ त्यांची कार आणि ट्रक यांच्यात जोरदार टक्कर झाली. यात दिलीप परसवाणी आणि सौ.महेक जितेंद्र परसवाणी हे जागीच ठार झाले, तर जितेंद्र परसवाणी, गौरव परसवाणी व उदय परसवाणी हे जखमी झाले. तिघांनाही ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, जितेंद्र परसवाणी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आज दुपारी नागपूरला हलविण्यात आले. या घटनेमुळे देसाईगंज शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!