April 27, 2025

ग्रामपंचायत निवडणूक : प्रारूप मतदार यादीवर हरकती आमंत्रित

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १०:

गडचिरोली,जिल्ह्यातील माहे जानेवारी, 2024 ते डिसेंबर, 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मीत, मागीलनिवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे तसेच बहिष्कार इतरकारणांमुळे निवडणुका होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तसेचनिधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतीलसदस्य थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांचा पोटनिवडणुकांसाठीपारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम घोषितकरण्यात आला आहे.

यानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 09 जुलै2024 असा असून हरकती सूचना दाखल करण्याचा कालावधी– 09 जुलैते 15 जुलै 2024 पर्यत राहणार आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीदिनांक 19 जुलै 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार यादीवर संबंधीत तहसिल कार्यालयासहरकती सूचना प्राप्त झाल्यानंतर नियमाप्रमाणे प्रभाग निहाय मतदार यादीअंतिम करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी प्रारुप मतदार यादीवर हरकती सुचना सादर करण्याचे आवाहन निवडणूक विभागाद्वारे करण्यात आलेआहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!