“आंधळी वळण मार्ग नागरिकांना ठरतोय धोकादायक; दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै ११:
कुरखेडा: तालुका मुख्यालय लगत असलेली सती नदीवर राष्ट्रीय महामार्ग करिता मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. सदर बांधकामाच्या बाजूला वाहतूक वळण मार्ग तयार करण्यात आला होता. सदर रपटा फुटल्याने कोरची , धानोरा , गडचिरोली अश्या मुख्य तालुक्यावरून कुरखेडा कडे येणाऱ्या तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिकांना गोठणगाव च्या चौरस्त्यावरून मालदुगी- वाघेडा आंधळी फाटा ते कुरखेडा असा जवळपास पंधरा किमी च्या रस्त्याने जावे लागत आहे.
सदर डांबरीकरण रस्ता मालदुगी ते वाघेडा पर्यंत खूपच फुटलेला असून खोलगट खड्डे पडलेले आहे आणि त्यात पाणी साचलेला असल्यामुळे नागरिकांना जाणे कठीण झाले आहे. तर बरेच नागरिक रात्री बेरात्री प्रवास करताना त्या खड्यात पडतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो . या नदीचा रपटा फुटल्याने विद्यार्थ्यांना शाळेत , कॉलेज मध्ये जाणे कठीण झाले असून काही गोर गरीब व्यक्ती मुलांचे शैक्षणिक वर्ष खराब होऊ नये म्हणून कुरखेडा मध्ये भाड्याने खोली करून दिले. तर दूध विक्रेते , किरकोड सामान खरेदी करणारे नागरिकांना अख्खा 15 किमी चा प्रवास करावा लागत आहे. नदीच्या रपटा फुटल्याने ग्राहक येत नसल्याने गोर गरीब व्यापारी चाय नास्ता टपरी चालवून कुटुंबाचे उदर निर्वाह करणारे आज रिकामे बसून राहतात.
प्रशासनाच्या सूचनेनुसार , मिळालेला वळता मार्ग खूप त्रासदायक असल्याने , त्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून मागील वर्षी प्रशासनाकडे तक्रार केली होती परंतु सदर डांबरीकरण रस्ता आंधळी ते वाघेडा पर्यंत बनविण्यात आला. मात्र जिथून फुटला आहे त्या ठिकाणी अजून रस्ता बनविण्यात आलेला नाही. आजच्या परिस्थिती रात्री बेरात्री धोकादायक ठरणारे खड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.