“शबरी आदिवासी महामंडळातर्फे १३ जुलै रोजी रोजगार प्रशिक्षण व कर्ज वाटप मेळावा”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै ११:
गडचिरोली,: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यालयाच्या वतीने 13 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वा. महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयात अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार लाभार्थींसाठी रोजगार प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर मेळाव्यात लाभार्थींना एन.एस.टी.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांचे मार्फत व्यवसाय सुरु करुन स्वत:चा उदरनिर्वाह किंवा त्यापासुन इतरांना होणारा रोजगार निर्माण होईल या दृष्टीने अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर कर्जाची रक्कम थेट लाभार्थीचे खात्यावर जमा होणार आहे. कर्जासाठी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार असुन अर्जासंबंधी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने अनुसुचित जमातीतील लाभार्थी ज्याचे वय किमान 18 ते 45 वर्ष असेल त्यांनी सदर मेळाव्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, विधाते भवन, तिसरा माळा, चामोर्शी रोड, गडचिरोली, येथे प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत महामंडळाचे व्यवस्थापक श्री. बोरोले व श्री भोयर यांनी कळविले आहे.