“ट्रक्टरच्या कॅचबिल मध्ये सापडत दूचाकी चालकाचा मृत्यु”

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै ११:कूरखेडा: वाकडी- कूरखेडा मार्गावर कॅचबिल लावलेल्या ट्रक्टरचा कचाट्यात सापडत दूचाकी स्वार यूवकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटणा आज गूरूवार रोजी सकाळी ९ वाजेचा सूमारास घडली
मृतक यूवकाचे नाव मनिष यादव लोहबंरे वय २४ रा.वाकडी असे आहे त्याचे कूरखेडा येथे कीराना दूकान आहे तो आज सकाळी आपल्या दूचाकीने सकाळी ९ वाजेचा सूमारास कूरखेडा कडे येत असताना समोरून शेतात चिखल करण्याकरीता वापरण्यात येणारा कॅचबिल लावलेल्या ट्रक्टरशी दूचाकीची समोरासमोर धडक झाली यावेळी ट्रक्टर कॅचबिल मध्ये मृतक सापडल्याने जागीच त्याचा मृत्यु झाला ट्रक्टर वाकडी येथीलच शेतकर्याचा आहे कूरखेडा पोलीस स्टेशन येथे ट्रक्टर चालक सचिन लालाजी मेश्राम रा.वाकडी याचा विरोधात भारतिय न्याय संहिता २८१,१०६(१),सह कलम १८४ या नविन मोटार वाहन कायद्यान्वे गून्हा दाखल करीत ट्रक्टर जप्त करण्यात आला आहे घटनेचा पूढील तपास साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांचा मार्गदर्शनात कूरखेडा पोलीस करीत आहेत.