“विठ्ठलराव बनपूरकर महाविद्यालया येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै ११: (मालेवाडा):
विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला वाणिज्य महाविद्यालय मालेवाडा येथे जागतिक लोकसंख्या दिवस, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, प्राचार्य डॉ. हरिश्चंद्र कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली, जागतिक लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रम रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप नंदेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. लोकसंख्या वाढीची कारणे , त्यांचे दुष्परिणाम त्यावर नियंत्रण कसे ठेवता येईल यावर सविस्तर माहिती अध्यक्षीय भाषणावरून दिले. सदर कार्यक्रमात सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. हिवराज राऊत याने प्रास्ताविकाच्या माध्यमातून लोकसंख्या व बेरोजगारी यावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रमोद कुमरे , प्रा.रामटेक प्रा. कन्नाके प्रा. अष्टेकर, प्रा.शहारे,कु. हेमलता बावनथडे,प्रा. डॉ.ठाकरे, तसेच श्री हिरामण उईके श्री देवेंद्र शेलोकर ,श्री मनोज समर्थ,श्री दीपक बनपूकर, श्री राहुल वाल्दे, श्री अविनाश जांभूळे तसेच बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पल्लवी काळे यांनी केले तर आभार प्रा. रुपेश लोहमबरे यांनी मानले.