“महसूल कर्मचारी विविध मागण्या घेवून संपावर ; काळ्या फिती लावून कार्यालयासमोर निदर्शने”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै ११: (कुरखेडा)
महसूल कर्मचारी संघटना जिल्हा गडचिरोली अंतर्गत तालुका शाखा कुरखेडा विविध मागण्या घेवून मागील दोन दिवसांपासून संपावर आहेत.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना तालुका शाखा कुरखेडाचे वतीने दिनांक 10/7/2024 पासून आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस दिनांक 11/07/2024 रोजी दुपारी वेळ 2.00 वाजता चे सुमरास कार्यालयात काळी फिती लावून कार्यालयासमोर निदर्शने देण्यात आले. महसुल कर्मचारी संघटनांची मुख्य मागणी अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा सुधारीत आकृतीबंध मंजूर करणे, तसेच नायब तहसीलदार या पदाचा ग्रेड पे रुपये 4800/- मंजूर करणेसह अनेक मागण्यांसह आंदोलनास सुरवात करण्यात आली.
आंदोलना दरम्यान महसुल कर्मचारी संघटना तालुका शाखा कुरखेडा चे नायब तहसिलदार श्री. आर.एच. धनबाते, सत्यनारायण अनमदवार उपविभागीय उपाध्यक्ष अ.का. नागसेन वैद्य उपविभागीय सचिव महसुल सहाय विजय भलावी यांचेसह अव्वल कारकुन जगदीश राठोड, धिरजकुमार जुमनाके, अविनाश चुन्ने, नितीन सवईमुल, मुकेश डाखळे महसुल सहायक संदिप राऊत, सिताबाई हिडामी, गिता वरखडे, संदीप तुपट, गोपाल लंजे, इंद्रकुमार चौधरी मनोज अलाम व शिपाई मायाबाई धुर्वे, यामिना मेश्राम व श्री. वालदे हे सर्व उपस्थित होते.